Curfew lifted in five districts 140 weapons stored with police in Manipur esakal
देश

Manipur : पाच जिल्ह्यांमधील संचारबंदी मागे; मणिपूरमध्ये पोलिसांकडे १४० शस्त्रे जमा

शहा यांनी त्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये विविध राजकीय पक्षांची शिष्टमंडळे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शांती प्रक्रियेची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मणिपूरच्या पाचही जिल्ह्यांतील संचारबंदी आज मागे घेण्यात आली. मंत्री शहा यांच्या इशाऱ्यानंतर स्थानिकांनी १४० शस्त्रे आज पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मागील महिन्यामध्ये हिंसाचाराचा भडका उडाल्यानंतर दंगेखोरांनी पोलिसांच्या शस्त्रागारातून दोन हजारांपेक्षाही अधिक शस्त्रे लुटली होती. शहा यांनी त्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये विविध राजकीय पक्षांची शिष्टमंडळे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला होता. राज्यातील हिंसाचाराचा सखोल तपास करण्यासाठी शांती समितीच्या स्थापनेची घोषणाही त्यांनी केली होती.

मागील २४ तासांमध्ये १४० शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. यामध्ये ‘एके-४७, इन्सास रायफली, अश्रुधुराच्या नळकांड्या,स्टेन गन, ग्रेनेड लॉँचर आणि दीर्घपल्ल्याचा मारा करणाऱ्या पिस्तुलांचा समावेश आहे.

शस्त्रागारातून पळविण्यात आलेली शस्त्रे जप्त करण्यासाठी पुन्हा शोध मोहीम राबविण्याचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला होता. बंडखोरांच्या गटांनाही त्यांनी कराराचे पालन करण्याची सूचना केली होती. तुम्ही नियम पाळणार नसाल तर कायदा त्यांचे काम करेल शहा म्हणाले होते.

केंद्र सरकारने २००८ मध्ये ‘युनायटेड पीपल्स फ्रंट’ आणि ‘कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन’सोबत करार केले होते. या दोन्ही बंडखोरांच्या संघटनांकडे २ हजार २०० एवढे स्वयंसेवक असून त्यांनी अद्याप शस्त्रांचा त्याग केलेला नाही. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सध्या दहा हजार जवान कार्यरत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचार थांबला असून सुमारे दहा जिल्ह्ात शांतता असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT