देश

यंदाच्या मान्सूनची देशातून माघार - IMD

यंदा जुनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये पावसावे दमदार एंट्री केली.

सकाळ डिजिटल टीम

यंदा जुनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये पावसावे दमदार एंट्री केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांकडे सरकला.

आज २५ ऑक्टोबर रोजी यंदाचा मान्सुनने माघार घेतला असल्याचं भारतीय हवामाव खात्याने जाहीर केलं आहे. यंदा जुनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये पावसावे दमदार एंट्री केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांकडे सरकला. दरम्यान यंदा मान्सून सामान्य राहणार असून पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के मान्सूनचा पाऊस बरसणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस पडू शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र देशात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून 6 ऑक्टोबरला सुरू झाला. जो दरवर्षी 17 सप्टेंबरच्या सुमारास निघतो. मात्र यंदा 6 ऑक्टोबरपासून तो सुरु झाला.

परतीच्या पावसाने राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला झोडपून काढले. या प्रदेशातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाच्या परतीच्या प्रवासात महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही राज्यांनाही जबरदस्त तडाखा दिला आहे. यामुळे अनेकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी जीवितहानीही झाली. उत्तरेकडील उत्तराखंड, दिल्लीत सारख्या राज्यात पावसाने हाहाकार माजवला. केरळमध्येही भूस्खलनाच्या घटना घडल्या. यात अनेकांचे जीव गेले असून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

दरम्यान यंदाच्या मान्सुनमुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि काही भागांत महापूरस्थिती निर्माण झाली होती. चिपळून येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याशिवाय सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांत भूस्खलनाच्या घटना घडल्या. यात अनेकजण जीवाला मुकले असून वित्तहानीही झाली आहे. याच दरम्यान आलेल्या शाहीन आणि तौक्ते चक्रीवादळाचा फटकाही कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसला आहे. यातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT