Gandhi Family Gandhi Family
देश

रविवारी सीडब्ल्यूसीची बैठक; गांधी कुटुंब देणार राजीनामा?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक (CWC meeting) रविवारी (ता. १३) होऊ घातली आहे. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा हे तिघेही काँग्रेस कार्यकारिणीकडे राजीनामे (Gandhi family to resign) देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर बैठकीत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

एनडीटीव्हीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रविवारी दिल्ली काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत मोठे घडणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रचाराचे नेतृत्व केले होते. मात्र, निवडणुकीत काँग्रेसची झोळी रिकामीच राहिली, असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षाच्या कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारून सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेच्या पदाचा राजीनामा (Gandhi family to resign) देऊ शकतात.

सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी यांनी पद सोडण्याची ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ मध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर दोन्ही नेत्यांनी पद सोडण्याची ऑफर दिली होती आणि ती सीडब्ल्यूसीने (CWC meeting) नाकारली होती. त्यावेळी पक्षाच्या खराब कामगिरीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली होती.

विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आता रविवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात हे तिघे राजीनामा देतात का? आणि दिला तर तो स्वीकारला जातो का? हेच पाहणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : पाच किलोमीटर गाडी ढकलणार पण पेट्रोल नाही भरणार! सीमकार्डनंतर आता JIO पंपावरही कोल्हापूरकरांचा बहिष्कार...पाहा VIDEO

हा चेहरा नेमका कोणाचा? ‘दशावतार’च्या गूढ पोस्टरमागे दडलेलं रहस्य १२ सप्टेंबरला उलगडणार!

Latest Marathi News Updates Live : सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्टसर्किटमुळे आग

SSC Disclosure Scheme: अंतिम यादीत नाव नाही? तरीही मिळू शकते सरकारी नोकरी! SSC च्या नव्या योजनेमुळे मिळणार संधी

Sanjay Raut : ''मराठीसाठी हिंसाचार करणार, काय उखडायचं ते उखडा''; संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज, वेगळ्या विदर्भाबाबतही केला मोठा दावा...

SCROLL FOR NEXT