Cyber Crime google
देश

Cyber Crime : सायबरबुलिंगचा वाढता विळखा

९५ टक्के तरुणांचा समावेश : ‘युनिसेफ’, ‘एनएसएस’चा अहवाल

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी : आसाममधील सुमारे ९५ टक्के युवकांना सायबरबुलिंग आणि शिक्षेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे, असा निष्कर्ष ‘युनिसेफ’ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी १९ टक्के लोकसंख्या १५ ते २४ या वयोगटातील आहे.

आसाम राज्य बालहक्क आयोगाच्या ‘सुरक्षा’ या मोहिमेच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले. मुलांवरील हिंसाचाराच्या प्रकाराबद्दल आणि निवारण यंत्रणेबद्दल जनजागृती करण्याचे या यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. युवकांची मते जाणून घेण्यासाठी यावर्षी जुलैमध्ये ‘यू रिपोर्ट’ पोल हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘युनिसेफ’ ने सुरू केला.

त्यात युवकांनी एसएमएस, फेसबुक, ट्विटर आदींच्या माध्यमातून सायबरबुलिंग, शिक्षेबद्दलची आपली मते, अनुभव व्यक्त केला. राज्यातील २४ विद्यापीठांतील एनएसएसचे साडेनऊ हजार स्वयंसेवकही या मतदानात सहभागी झाले होते. एकूण सहभागींपैकी निम्म्यांनी अज्ञात व्यक्तीने सायबरबुलिंग केल्याची तक्रार केली. तर १२ टक्के युवकांनी वर्गमित्र व १४ टक्के तरुणांनी मित्राने धमकाविल्याचे सांगितले. फेसबुकवर ३६ टक्के तर इन्स्टाग्रामवर २५ टक्के युवकांना सायबरबुलिंगचा अनुभव आला. त्याचप्रमाणे, ३५ टक्के सहभागींना घरी, २५ टक्के सहभागींना शिक्षणसंस्थेत तर १४ टक्के युवकांना इतरत्र शारीरिक शिक्षा दिली गेली.

गुवाहाटी येथील डॉ.मैथिली हजारिका म्हणाल्या, की युवकांमध्ये डिजिटल माध्यमे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सायबरबुलिंग सर्वसामान्य बाब झाली आहे. काही प्रकरणांत तर आत्महत्याही झाल्या आहेत. त्यामुळे, युवकांत अलिप्तता, न्यूनगंड, चिंता, नैराश्य, एकटेपणा वाढत आहे. या त्रासाला आपणच जबाबदार आहोत, ही भावनाही बळावत आहे. त्यामुळे, पीडितांनी सायबरबुलिंगबद्दल तत्काळ आपल्या कुटुंबाला कल्पना देऊन कायद्याची मदत घेतली पाहिजे.

युवकांवरील परिणाम (आकडे टक्क्यांत)

  • सामाजिक संबंध बिघडले - ६०

  • ताण, चिंता, भीतीत वाढ - २४

  • शारीरिक इजा होणारे - १७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांच्या हक्कासाठीच मोर्चा, महिलेची भाषा असंसदीय, पोलिसांना...; मंत्री महाजनांची पहिली प्रतिक्रिया

Jihe Kathapur Water Scheme : जिहे-कठापूर योजनेत मोठा पाणी घोटाळा? उपलब्धतेपेक्षा जास्त लाभक्षेत्र वाढवल्याचा शशिकांत शिंदेंचा खळबळजनक आरोप; शेतकरी संकटात

Latest Marathi News Live Update: शेतकरी कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

IPL 2026: CSK संघाला उधारीवर खेळाडू देणार RCB? अश्विनने सुचवलाय मार्ग, पण नेमका Loan चा नियम आहे काय?

'या' लोकप्रिय मराठी मालिकेनं वर्षभरातच घेतला निरोप! मुख्य अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली... 'तरुण मुलींना प्रेरित केलं पण...'

SCROLL FOR NEXT