Cyclone Biparjoy: 
देश

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाने घेतला पिता-पुत्रांचा जीव; 22 जण जखमी

अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले.

धनश्री ओतारी

अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले. यावेळी वादळातील वाऱ्यांचा वेग १४५ किमी प्रतितास इतका होता, तर वादळ १५ किमी वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादळामुळे पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंत या वादळानं वादळामुळे गुजरातमध्ये 22 जण जखमी तर 23 जनावरांचा मृत्यू झालाय. Cyclone Biparjoy update Gujarat's Father and son lost their lives in trying to save cattle

वादळामुळे गुजरातच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. भावनगर जिल्ह्यात खड्ड्यात अडकलेल्या आपल्या शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

पिता-पुत्र आणि त्यांच्या 23 जनावरांचा मृत्यू

गुजरातमधील भावनगरमध्ये वादळामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळपासून झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सिहोर शहराजवळील भंडार गावातून जाणाऱ्या खंतीमध्ये पाणी वाहू लागले.

अचानक पाणी आल्याने शेळ्यांचा कळप खड्ड्यात अडकला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले रामजी परमार (55) आणि त्यांचा मुलगा राकेश परमार (22) हे दोघे खंटी येथे गेले, मात्र जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले. या अपघातात 22 शेळ्या आणि एका मेंढ्याचाही मृत्यू झाला.(Latest Marathi News)

अरबी समुद्रातून उठलेले चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या 940 गावांमधून ताशी 13 किमी वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. त्याच्या प्रभावाखाली शुक्रवारी उत्तर गुजरातच्या पाटण आणि बनासकांठामध्ये मुसळधार पाऊस पडेल. वादळ कच्छमधून पाकिस्तानच्या सीमेला भिडले आहे.(Latest Marathi News)

बिपरजॉय वादळ गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता गुजरातच्या कच्छ-सौराष्ट्रला धडकले. रात्री राजस्थानच्या बारमेरमध्ये आकाशाला भिडले आणि एन्ट्री घेतली. वादळामुळे मेहसाणा, दाहोद, खंभात आणि भावनगरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्याची लँडफॉल प्रक्रिया मध्यरात्री पूर्ण झाली.

यावेळी ताशी १२५ ते १४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. नंतर वाऱ्याचा वेग 108 किमी प्रतितास इतका कमी झाला. भुजमध्ये ५ इंचापर्यंत पाऊस झाला आहे. द्वारका आणि भुजमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT