Cyclone Dana ESakal
देश

500 हून अधिक ट्रेन रद्द, विमानांवर 16 तासांसाठी बंदी... 'Dana' वादळ किनारपट्टीला धडकणार?

Cyclone Dana: दाना चक्रीवादळाबाबत नवी मोठी अपडेट समोर आली आहे. हे वादळ आता किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Vrushal Karmarkar

‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 'दाना' आज ओडिशात धडकू शकते आणि उद्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. वादळाच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.'दाना' चक्रीवादळामुळे ओडिशा आणि बंगालच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

या वादळामुळे 500 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विमानांना 16 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. एनडीआरएफच्या 50 हून अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 'दाना' चक्रीवादळाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी ओडिशाच्या अनेक किनारी जिल्ह्यांमधून सुमारे 10 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम बंगालमध्ये 1.14 लाखांहून अधिक लोकांना आधीच आश्रयस्थानी नेण्यात आले आहे.

'दाना' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तयारीचा आढावा घेत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले आहे की, 30 टक्के लोक (तीन-चार लाख) धोक्याच्या क्षेत्रात राहत आहेत, त्यांना बुधवारी संध्याकाळी तेथून हलवण्यात आले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात राहण्याचे आवाहन केले आहे.

तर दुसरीकडे जेव्हा हे वादळ ओडिशात धडकेल तेव्हा त्याचा वेग ताशी 120 किलोमीटर असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना त्यांच्या संबंधित आरोग्य केंद्रात परत बोलावण्यात आले आहे. 'दाना' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF ने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये एकूण 56 टीम तैनात केल्या आहेत. हे चक्रीवादळ 24 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या पथकांकडे खांब आणि झाडे तोडण्यासाठी उपकरणे आहेत.

महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

'दाना' चक्रीवादळाचा चार राज्यांना धोका आहे. तर महाराष्ट्रातही ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडत आहे. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT