चेन्नईत मुसळधार पावसाचे थैमान! eSakal
देश

Chennai Rain : चेन्नईत मुसळधार पावसाचे थैमान! २०१५ च्या पुनरावृत्तीची भीती, थरारक Video व्हायरल

Heavy rain in Chennai! Fear of 2015 repeat, thrilling video viral...

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या तीव्र चक्रीवादळामुळे बदललेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईला फटका बसला. चेन्नईसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.

वाहने पाण्यात बुडाली असून येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. अतिवृष्टीने २०१५च्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या. असून त्याच्या पुनरावृत्तीची भीती नागरिकांना वाटत आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची एकच धांदल उडाली. विशेषत: एवढा मोठा पाऊस कोसळत असूनही पिण्याच्या पाण्याची मागणीत मोठी वाढ झाली. मिचाँग या तीव्र चक्रीवादळामुळे चेन्नईसह नजीकच्या कांचीपुरम, चेंगालपेट आणि तिरूवल्लूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे.

चेन्नईत पावसाचा जोर एवढा होता, की रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पाण्याला वाट करून रस्ते मोकळे करण्यासाठी मशिनची मदत घेण्यात आली. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला.

७० विमाने रद्द, रेल्वेसेवेलाही फटका

या पावसाचा चेन्नईतील रेल्वे आणि विमानसेवेलाही फटका बसला. अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या असून विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.

चेन्नईतील विमानतळ बंद असल्याने विमानतळावरून उड्डाण होणारी तसेच उतरणारी अशी एकूण ७० विमाने रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे, डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या सहा रेल्वे रद्द कराव्या लागल्या, अशी माहिती रेल्वेच्या दक्षिण विभागाकडून देण्यात आली. (70 flights cancelled, railway service also affected)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT