cyclone sitrang  sakal
देश

Cyclone Sitrang : बांगलादेशला ‘सितरंग’चा तडाखा; नऊ जणांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘सितरंग’ चक्रीवादळाने सोमवारी (ता.२४) रात्री बांगलादेशला धडकले.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘सितरंग’ चक्रीवादळाने सोमवारी (ता.२४) रात्री बांगलादेशला धडकले.बांगलादेशातील बारिसालजवळ या चक्रीवादळाने बांगलादेशची किनारपट्टी पार केली. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बांगलादेशात नऊ जणांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. बांगलादेशात सुमारे दहा लाख जणांचे स्थलांतर करण्यात आले होते. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. बांगलादेशची राजधानी ढाक्यात मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय झाला.

सुदैवाने, भारतीय किनारपट्टी ‘सितरंग’च्या तडाख्यापासून बचावली. प.बंगालच्या दक्षिणेकडील काही जिल्ह्यांतील हवामानात सुधारणा होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला. गेल्या आठवड्यात उत्तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ बांगलादेशकडे ताशी ५६ कि.मी.वेगाने सरकले होते. त्यानंतर, सोमवारी रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान ताशी १०० कि.मी.वेगाने ‘सितरंग’ने बांगलादेशातील बरिसालजवळील तिनकोना आणि सॅंडविपचा किनारा पार केला. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वीज व दूरध्वनी संपर्क तुटल्याने बांगलादेशचा किनारी भाग अंधारात बुडाला. या चक्रीवादळामुळे बांगलादेशच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, बांगलादेशला धडकल्यानंतर पुढील काही तासांतच चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले.

बंगालमध्ये पाऊस, आसामात घरे कोसळली

शेजारच्या प.बंगालला चक्रीवादळाचा थेट तडाखा बसला नसला तरी राज्यातील दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि पूर्व मिदनापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले. आसाममधील नागाव जिल्ह्यात अनेक घरे कोसळली, वृक्ष उन्मळून पडले. ‘सितरंग’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे प.बंगालच्या किनाऱ्यावर ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT