file photo File photo
देश

'यास' चक्रीवादळ सोमवारपासून सक्रीय; ओडिशा, बंगालला दक्षतेचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण होणारं हे चक्रीवादळ २६ मे रोजी पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळानं नुकतंच देशाच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढल्यानंतर आता 'यास' चक्रीवादळाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होणार असून सोमवारपासून पूर्व किनारपट्टीच्या भागात वादळी वारे निर्माण व्हायला सुरुवात होईल. दरम्यान हे चक्रीवादळ २६ मे रोजी किनाऱ्यावर धडकेल. यासाठी ओडिशा, बंगाल या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Cyclone Yaas Alert in Odisha Bengal IMD says cyclonic storm form by Monday)

या 'यास' चक्रीवादळाबाबत ताजी अपडेट देताना IMD सांगितलं, "बंगालच्या उपसागरात शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. यामुळे सोमवारी याचं वादळी वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. येत्या ७२ ते १२० तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला सुरुवात होईल"

२६ मे रोजी किनाऱ्यावर धडकणार

'यास' चक्रीवादळ वायव्य दिशेनं प्रवास करत असून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर बुधवारी, २६ मे रोजी धडकणार आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि अंदमान आणि निकोबार बेटांसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्याचे दिले आहेत.

नौदल, तटरक्षक दल सज्ज

ओडिशातील १४ ते ३० जिल्ह्यांवर या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून या जिल्ह्यांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीसाठी भारतीय नौदलाला आणि तटरक्षक दलाला सज्ज राहण्याची विनंती ओडिशा सरकारने केली आहे. तसेच रेल्वेने बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशला जाणाऱ्या २२ विशेष गाड्या रद्द केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT