d raja says BJP should defeated for secular democracy politics Sakal
देश

Lok Sabha Election 2024 : लोकशाहीसाठी भाजपचा पराभव व्हावा - डी. राजा

देशामध्ये सध्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर हल्ले होऊ लागले असून लोकसभेची आगामी निवडणूक ही देशासाठी महत्त्वपूर्ण असेल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशामध्ये सध्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर हल्ले होऊ लागले असून लोकसभेची आगामी निवडणूक ही देशासाठी महत्त्वपूर्ण असेल. या देशाची राज्यघटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव करणे गरजेचे असल्याचे मत कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी मांडले.

केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ‘मोदी की गॅरंटी’ हे घोषवाक्य चर्चेत आणले असल्याचा आरोपही राजा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. जनतेला नोकऱ्या देण्याबरोबरच, काळे धन देशात परत आणण्यात आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘‘मागील दहा वर्षांच्या काळामध्ये या देशात अत्यंत विनाशकारी अशी राजवट पाहायला मिळाली. लोकशाही व्यवस्थाच संकटामध्ये सापडली आहे. संसदेलाच मोडीत काढण्याचा प्रकार सुरू आहे. संसदेच्या मागील हिवाळी अधिवेशनामध्ये एकाचवेळी १४० खासदारांचे निलंबन करण्यात आले होते,’’ असेही त्यांनी सांगितले.

‘‘लोकशाही व्यवस्थेत विरोधकांना महत्त्वाचे स्थान असते. कारण तेच सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत असतात. संसदेलाच कालबाह्य ठरविण्यात आले तर मात्र लोकशाहीचा मृत्यू होऊ शकतो. आज भारतामध्ये नेमकी तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT