mohanbhai delkar
mohanbhai delkar 
देश

Breaking - खासदार मोहनभाई डेलकर यांची मुंबईत आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हेवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं जातं आहे. खासदार डेलकर यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. अपक्ष खासदार असलेले डेलकर यांचे वय 58 वर्षे इतके होते. 

खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी गुजरातीमध्ये सुसाइड नोटही सापडली असल्याचं म्हटलं जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत. 

डेलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. त्यांनी 1985 मध्ये आदिवासी विकास संघटना स्थापन केली होती.

1989 मध्ये ते पहिल्यादा दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. 1991 आणि 1996 मध्ये ते काँग्रेसतर्फे पुन्हा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 1998 मध्ये भाजपकडून ते लोकसभेत आले. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून आणि 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पार्टीतर्फे त्यांनी लोकसभेची जागा मिळवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT