Flight
Flight  Sakal
देश

Video : मोठा अपघात टळला! टेकऑफवेळी धावपट्टीवर आदळलं विमान; १८२ प्रवाशांचा जीव टांगणीला

सकाळ डिजिटल टीम

AI Express Flight Emergency Landing On Thiruvananthapuram Airport : कालिकतहून सौदी अरेबियाच्या विमानाच तिरुअनंतपुरम विमानतळावर आपतक्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात १८२ प्रवासी होते. वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. (Dammam Bound AI Express Flight Emergency Landing On Thiruvananthapuram Airport )

हेही वाचा : जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी एयर-इंडिया एक्सप्रेस IX 385 या विमानाने कालिकत येथून सौदी अरेबियाच्या दम्मामकडे उड्डाणे केले होते.

मात्र, उड्डाणावेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. यामुळे विमानाच्या हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाला. यानंतर या विमानाचे १२.१५ वाजता तिरुअनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

यावेळी विमानात १८२ प्रवासी प्रवास करत होते. अचानक विमान तिरुअनंतपुरमकडेवळवण्यात आल्याने येथील विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली होती.

टेकऑफवेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानातील इंधन अरबी समुद्रात रिकामे केले. त्यानंतर तिरूअनंतपुरम येथील विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.

ज्यावेळी हे विमान तिरूअनंतपुरम विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली होती.

दरम्यान, वैमानिकाच्याप्रसंगावधाने या विमानाचा मोठा अपघात टळला असून, १८२ प्रवाशांची जीव वाचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT