Danish Sidiqui File Photo
देश

जामिया विद्यापीठात होणार दानिश सिद्दीकींचा दफनविधी

पुलित्झर पुरस्कारप्राप्त फोटो जर्नलिस्टचा अफगाणिस्तानात झाला दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च पुलित्झर पुरस्कारप्राप्त फोटोजर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दहशतवादी आणि सैन्यातील संघर्षाचं कव्हरेज करताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दानिश सिद्दीकी दिल्लीतील ज्या जामिया मिलिया विद्यापाठातून शिकले त्याच विद्यापीठाच्या कब्रस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी पार पडणार आहे.

दानिश सिद्दीकी हे न्यूज एजन्सी रॉयटर्ससाठी काम करत होते. सिद्दीकी यांचं पार्थिव शरीर काबूल येथून एअर इंडियाच्या विमानानं रविवारी संध्याकाळी भारतात दाखल होणार आहे. दरम्यान, जामिया विद्यापीठातील कब्रस्तान जामियातील कर्मचारी, त्यांच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलांचे मृतदेह दफन करण्यासाठी आरक्षित आहे. मात्र, दानिश यांच्या कुटुंबियांनी त्यांचं पार्थिव जामिया विद्यापीठातील कब्रस्तानमध्येचं दफन करण्याची विनंती कुलगुरुंकडे केली होती. या विनंतीला मान देऊन प्रोटोकॉलबाहेर जात परवानगी दिली आहे.

दानिश सिद्दीकी हे जामिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. तसेच त्यांचे वडील मोहम्मद अख्तर सिद्दीकी जामिया विद्यापीठात माजी प्राध्यापक होते, ते जामिया नगरमध्ये राहत होते. दानिश यांनी जामियातूनच आपलं शालेय, अर्थशास्त्रात पदवी आणि नंतर मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. जामियाच्या कुलगुरु नझमा अख्तर यांनी शनिवारी दानिशच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वनं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT