Darbhanga Medical College esakal
देश

मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थ्यांचा धिंगाणा; 4 जणांना जाळण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

विद्यार्थ्यांच्या वादातून 4 दुकानं, दुचाकीसह 2 गाड्या जाळण्यात आल्या आहेत.

दरभंगा : बिहारमधील (Bihar) दरभंगा मेडिकल कॉलेज (Darbhanga Medical College) आणि हॉस्पिटल (DMCH) परिसरात काल (शुक्रवार) रात्री उशिरा विद्यार्थ्यांत जोरदार वाद झाला. यात 4 दुकानं, दुचाकीसह 2 गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तसेच या आगीत 4 जणांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तर एका तरुणावर कात्रीनं वार करण्यात आला. दरम्यान, आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवानही यात गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मेडिकल कॉलेजचे 4 ते 5 विद्यार्थी जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दरभंगा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी (Medical College Student) आणि मेडिकल दुकानदार यांच्यात झालेल्या वादातून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मॅगी घेण्यासाठी किराणा दुकानात पोहोचले. त्यावेळी दुकानदार दुकानात नव्हता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शेजारील मेडिकल दुकानात बसलेल्या दुकानदाराला याबाबत विचारणा केली. मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्यानं थांबा.. दुकानदार काही वेळात येतील, असं सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या कर्मचाऱ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली.

इतक्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतलं. या वादातून एका विद्यार्थ्यानं मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याच्या तोंडावर कात्रीने वार केले. त्यानंतर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ ऐकून दुकानमालक घरातून बाहेर आले. दरम्यान, दुकानदारांशी वाद घालत असताना विद्यार्थ्यांनी दुकानदारांवर पेट्रोल फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जावेद खान असं दुकानदाराचं नाव आहे. दरम्यान, एसडीपीओ कृष्ण नंदन कुमार (SDPO Krishna Nandan Kumar) यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलीय, असं नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT