lockdown
lockdown 
देश

पुन्हा लॉकडाउनचे दिवस, फ्रान्सनंतर बांगलादेशात निर्बंध; भारतातही निर्णयाची शक्यता?

सकाळ डिजिटल टीम

कोरोना विषाणूचा जगभरात पुन्हा एकदा कहर सुरु झाला असून परिस्थिती गेल्यावर्षीपेक्षा अधिक बिघडत चालली आहे. भारतातही अनेक राज्यात अंशतः लॉकडाउनसारखी परिस्थिती आहे. तर भारताचा शेजारील देश बांगलादेशमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रकरणात वाढ झाल्यानंतर बांगलादेश सरकारने ५ एप्रिलपासून एका आठवड्यासाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. यापूर्वी फ्रान्सने देखील देशात तिसऱ्यांदा लॉकडाउनची घोषणा केली आहे. 

पुणे : सुमारे १२ टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाईन वर्गांना दांडी, पालकही गंभीर नसल्याचं उघड!

ढाका ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, बांगलादेशात लॉकडाउनदरम्यान कोर्ट आणि कार्यालये बंद राहतील केवळ उद्योग सुरु राहतील. उद्योग आणि कारखाने यासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत कारण मजुरांचं काम बंद झाल्यानंतर परत घरी जावं लागू नये. 

फ्रान्समध्येही लॉकडाउन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन शनिवारी म्हणजेच आजपासून लागू झाला आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारी कोरोनाचे ४६ हजार ६७७ नवीन प्रकरणं समोर आली होती. जी गेल्या आठवड्यांच्या तुलनेत ६.२ टक्के जास्त आहेत. फ्रान्समध्ये या दरम्यान कोरोनापासून ३३२ मृत्यू झाले आहेत. फ्रान्समध्ये आजवर कोरोनामुळे ९६ हजार २८० लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये आता पुढील चार आठवडे लॉकडाउन लागू राहिल. 

महाराष्ट्रातही लॉकडाउनचा इशारा

राज्यात कोरोना संसर्गाच्या विस्फोटानंतर पुणे जिल्ह्यातील बार, हॉटेल आणि रेस्तराँ सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या बारा तासांच्या काळात कर्फ्यु लावण्यात आला आहे. राज्यात दररोज कोरोनाचा उद्रेक होत असून नवा उच्चांक निर्माण होत आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update : काँग्रेसला सीएएबद्दल खोटे बोलून दंगल घडवायची होती', पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला

Alia Bhatt: विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील, पण ही यादी कसली?

Flight Ticket Price : दुबईपेक्षा देशांतर्गत विमान प्रवास महाग; ५० ते ६० टक्के भाडेवाढ, पर्यटकांना उन्हाळ्यात दरवाढीचे चटके

Singapore Air Forceच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून... वाचा या प्रकरणातील भारतीय कनेक्शन

SCROLL FOR NEXT