Madhya Pradesh esakal
देश

Madhya Pradesh : शपथविधीपूर्वीच उपमुख्यमंत्री झाले जखमी; यादवांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

राजेंद्र शुक्ल हे कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना झालेल्या धक्काबुक्कीत ते जखमी झाले.

संतोष कानडे

MP Deputy CM Rajendra Shukla Injured : मध्य प्रदेशचे नेते राजेंद्र शुक्ल जखमी झाले आहेत. शुक्ल हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच जखमी झाले.

राजेंद्र शुक्ल हे कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना झालेल्या धक्काबुक्कीत ते जखमी झाले. त्यांच्या घरी काही उत्साही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शुक्ल यांच्या गळ्यात फुलमाळा घालण्यासाठी कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत होते.

याच गर्दीमध्ये धक्काबुक्की झाली आणि राजेंद्र शुक्ल यांच्या खांद्याला किरकोळ जखम झाली. प्राथमिक उपचारांसाठी शुक्ल यांना रुग्णालयात पाठवण्यात आलेले होते. दुसरीकडे भाजप नेते मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे..

यासोबत भाजप नेते जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला यांनी भोपाळमध्ये मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सपोर्ट स्टाफची ‘फुगवलेली भरती’

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2025

नातेसंबंध टिकवायचे तर...

साप्ताहिक राशिभविष्य : (२० जुलै २०२५ ते २६ जुलै २०२५)

Chandrababu Naidu wife New: चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीने ‘या’ FMCG शेअरमधून एकाच दिवसांत कमवला ७८,८०,११,६४६ रुपयांचा नफा!

SCROLL FOR NEXT