DCP Kavasji Jamshedji Petigara
DCP Kavasji Jamshedji Petigara Sakal
देश

DCP Kavasji Jamshedji Petigara : महात्मा गांधींना तुरूंगात टाकणारे भारताचे पहिले DCP कावसजी पेटीगारा!

सकाळ डिजिटल टीम

इंग्रजांनी भारतावर अनेक वर्ष राज्य केले. त्या काळात त्यांनी देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडवली. भारतीय लोकांना जणू ते आपले गुलामच समजत होते. भारतीयांनी त्या काळात अनेक आत्याचार सहन केले. एकीकडे हे चित्र होते तर दुसरीकडे अनेक भारतीय तरूणांची ब्रिटिश सैन्यात भरतीही करण्यात येत होती. त्याच वेळी ब्रिटीश सरकारचा हुकूम मान्य करत अनेक भारतीयांनी आपल्याच भावंडांवर आत्याचार केले.

स्वातंत्र्य संग्रामात लढा देणाऱ्या अनेक वीरांना भारतीयच पण ब्रिटीशांसाठी काम करणाऱ्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. यातच एक नाव प्रामुख्याने घेतले जाते ते म्हणजे ब्रिटीशकालीन पहिले पोलीस उपआयुक्त कावसजी जमशेदजी पेटीगारा यांचे.

स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नावाशिवाय अपूर्णच आहे. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या जोरावर महात्त्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. असे असले तरी गांधीजी यांचे अनेक शत्रूही त्याकाळात होते. अशा गांधीजींना अनेकदा तुरूंगात टाकण्याचे धाडस कावसजी पेटीगारा यांनी केले. अटक केली तरी गांधीजींच्या प्रती त्यांच्या मनात केवळ आदरच होता. आज कावसजी पेटीगारा यांचा स्मृतीदिन. आज त्यांच्याबद्दलच काही किस्से जाणून घेऊयात..

कावसजी जमशेदजी पेटीगारा हे ब्रिटीश राजवटीमधील एक मोठे भारतीय अधिकारी होते. जमशेदजी पेटीगारा यांची 1926 मध्ये मुंबई सीआयडीचे डीसीपी म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1877 रोजी एका पारशी कुटुंबात झाला. त्यांनी सुरत आणि मुंबई येथून शिक्षण पूर्ण केले होते. पेटीगारा यांचा दबदबा असा होता की, अनेक ब्रिटीश अधिकारीही त्यांचा आदेश मानत होते. कावसजी यांना कोणत्याही प्रकारचा गणवेश देण्यात आला नव्हता. ते नेहमी साध्या कपड्यात कामावर हजर असायचे.

इतकेच काय तर, त्यांना कोणत्याही प्रकारचे पोलीस प्रशिक्षणही दिले गेले नव्हते. पण तरीही ते ब्रिटीश अधिकाऱ्यांना वरचढ ठरत होते. कारण, पारशी लोकांशी असलेल्या चांगल्या संपर्क आणि शहराबद्दल असलेली चोखंदळ माहिती यामूळे ते कर्तव्यनिष्ठ होते. त्यांना कोणत्याही शिफारशी शिवाय बढतीही मिळाली होती. कावसजी यांनी संपूर्ण आयुष्य सीआयडीसाठी वाहिले. यामूळेच ते गुप्त पद्धतीने काम करायचे. त्यांनी कधीही कोणत्या पोलीस ठाण्यात निवांत बसून काम केले नाही. त्यामूळे ते गुप्त माहिती शोधण्यात तरबेज झाले होते.

भारत छोडो यात्रेवेळी महात्मा गांधीना केली अटक

महात्मा गांधी सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करणार अशी माहिती मिळताच ब्रिटीश सरकारने गांधीजींना अटक करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाला डावलणे कठीण असल्याने पेटीगारा यांनी त्यांना अटक केली. पण, त्यांच्या मनात गांधीजींबद्दल केवळ आदरच होता. आपल्या अटकेचे फर्मान ब्रिटीश सरकार काढणार अशी कुणकुण लागताच गांधीजींनी एक विनंती ब्रिटीश सरकारला केली. मला अटक करण्यात येईल तेव्हा तिथे कावसजीही उपस्थित असावेत, असा आग्रहच गांधीजींनी केला. कारण कावसजी त्यांचे काम करत आहेत त्यामूळे त्यांच्यावर रागवण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत गांधीजींचे होते. गांधीजींच्या या शब्दाचा मान राखत कावसजीही त्या प्रसंगी तिथे हजर राहिले.

काही दिवसांनी महात्मा गांधी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला जात होते. त्यासाठी त्यांना शिफारसीची दोन पत्रे लागणार होती. त्यापैकी एक पत्र कावसजी यांनी दिले होते. हे पत्र आजही संग्रहालयात जपून ठेवण्यात आले आहे. मुंबईचे तत्कालीन प्रसिद्ध सर्जन डॉ. गिल्डर हेही गांधीवादी होते. गांधींच्या प्रत्येक अटकेवेळी तिथे हजर राहून त्यांच्याबरोबर स्वतालाही अटक करून घेत. एकदा कावसजींवरच डॉ. गिल्डर उपचार करीत असताना गांधीजींच्या अटकेची बातमी आली. डॉक्टरांनी गांधीजींना चिठ्ठी पाठवली की माफ करा, मी कावसजी पेटीगारांवरच उपचार करतोय.

कावसजी जमशेदजी पेटीगारा यांनी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना स्वातंत्र्यलढ्यात 'खान बहादूर' ही पदवी आणि इतर अनेक सन्मान मिळाले. त्यांना केसर-ए-हिंद पदक, इम्पीरियल सर्व्हिस ऑर्डर आणि किंग्ज पोलीस मेडल देण्यात आले आहे.

मुंबईत जेव्हा धोबी तलावाजवळ त्यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची वार्ता पसरली तेव्हा भारतीय नागरिकांनी वर्गणी काढून संगमरवरी पूर्णाकृती पुतळ्याचे काम तडीस नेले. अशा या कर्तव्यनिष्ठ भारतीय अधिकाऱ्याचे 28 मार्च 1941 रोजी निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT