देश

'स्पा' सेंटरमध्ये सेक्स रॅकेटला प्रोत्साहन, 'जस्टडायल'ला DCW कडून समन्स

१५० पेक्षा जास्त मुलींचे फोटो व त्यांचे दरपत्रक सोबत जोडलेले होते.

दीनानाथ परब

मुंबई: 'स्पा' (Spa) मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटला (Sex racket) प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दिल्ली महिला आयोगाने जस्टडायलला (Justdial) समन्स बजावलं आहे. दिल्ली गुन्हे शाखेला नोटीस बजावली असून FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. दिल्लीच्या स्पा मध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटसंबंधी दिल्ली महिला आयोगाला अलीकडे अनेक तक्रारी मिळाल्या होत्या.

तपासाचा भाग म्हणून आयोगाने एक तपास पथक बनवलं व 'जस्टडायल. कॉमवरुन' दक्षिण दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या स्पा सेंटर्सचे फोन नंबर मागितले. २४ तासांच्या आत आयोगाच्या टीमला १५ कॉल आले व काही ठराविक स्पा सेंटरकडून ३२ WhatsApp मेसेजेस आले. त्यावर १५० पेक्षा जास्त मुलींचे फोटो व त्यांचे दरपत्रक सोबत जोडलेले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

ज्या फोन नंबरवरुन मेसेज आला होता. त्या स्पा सेंटरने तरुण मुलीचा फोटो आणि अश्लील मेसेज पाठवला होता. आणखी एका फोन क्रमांकावरुनही मेसेज आला होता. त्यांनी १४ मुलींच्या फोटोसह अन्य माहिती शेअर केली होती. दिल्ली महिला आयोगाने ही माहिती दिली.

आयोगाने फक्त स्पा सेवेबद्दल माहिती मागितली होती. पण अन्य माहिती सुद्धा देण्यात आली. त्यामुळेच महिला आयागाने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे कठोर कारवाई करण्याची आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. आयोगाने जस्ट डायलच्या व्यवस्थापनाला समन्स बजावलं आहे.

त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या स्पा सेंटरची पार्श्वभूमी तपासण्याची काय पद्धत आहे, त्या बद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. आयोगाच्या टीमला सेक्स सर्व्हीसची माहिती पाठवणाऱ्या स्पा सेंटर्सबद्दल सविस्तर माहिती मागितली आहे तसेच आपल्या साईटवर नोंदणी करण्यासाठी अशा स्पा सेंटर्सकडून किती रक्कम घेतात, त्या बद्दलही विचारणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT