DDMA meeting on April 20 in the background of Corona DDMA meeting on April 20 in the background of Corona
देश

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढले; डीडीएमएची २० ला बैठक

सकाळ डिजिटल टीम

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या (Corona) प्रकरणांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांवर विचार करण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) २० एप्रिल रोजी बैठक बोलावली (DDMA meeting) आहे. दिल्लीत बुधवारी कोविडची २९९ नवीन प्रकरणे समोर आली होती. यात दोन दिवसांत ११८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, संसर्ग दर २.४९ टक्के आहे. सोमवारी १३७ रुग्ण आढळले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. (DDMA meeting on April 20 in the background of Corona)

पुढील आठवड्यात बुधवारी उपराज्यपालांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार आहे. बैठकीत अलीकडील प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीसह सध्याच्या कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाईल, असे दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दिल्ली सरकार कोरोना (Corona) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याने घाबरण्याची गरज नाही, असे एक दिवसाआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात काही शाळकरी मुलांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. दिल्लीतील संसर्ग दर आठवडाभरात ०.५ टक्क्यांवरून २.७० टक्क्यांवर पोहोचला आहे. दररोज नवीन रुग्णांची संख्या अजूनही कमी असल्याने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सुधारणा लक्षात घेऊन सर्व निर्बंध उठवले

दिल्ली (Delhi) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याच महिन्याच्या सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल दंड आकारण्याचा निर्णय मागे घेतला होता. फेब्रुवारीमध्ये परिस्थितीतील सुधारणा लक्षात घेऊन सर्व निर्बंध उठवले होते. यावर्षी १३ जानेवारीला दिल्लीतील दैनंदिन प्रकरणांची संख्या २८, ८६७ च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. दिल्लीत १४ जानेवारीला ३०.६ टक्के संसर्ग दर नोंदवला गेला. जो साथीच्या रोगाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान सर्वाधिक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT