kiren rijiju supreme court 
देश

'ते लोकशाहीला घातक...'; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी कायदामंत्र्यांना सुनावलं!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - न्यायमूर्तींच्या नियुक्तीवरून सर्वोच्च न्यायालयाबरोबरचे मतभेद केंद्र सरकारकडून जाहीरपणे व्यक्त होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन यांनी शुक्रवारी सरकारवर टीका केली. न्यायमूर्ती नरिमन यांनी एका जाहीर कार्यक्रमात कायदामंत्री किरण रिजिजू यांच्यावर निशाणा साधला. तसेच न्यायालयाचा निर्णय 'योग्य असो वा अयोग्य' तो स्वीकारणे हे त्यांचे 'कर्तव्य' आहे, असं ते म्हणाले.

खुद्द न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन २०२१ सेवानिवृत्त होण्यापूर्वी कॉलेजियमचा भाग होते. फली नरिमन यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्यावरही निशाणा साधला. धनखडं यांनी घटनेच्या मूलभूत रचनेच्या तत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कॉलेजियमने सुचवलेल्या नावांवर केंद्राने घेतलेल्या बैठकीबाबत नरिमन म्हणाले की, हे लोकशाहीसाठी घातक आहे. याबाबत सरकारला उत्तर देण्यासाठी ३० दिवसांची मुदत द्यायला हवी अन्यथा दिलेल्या सूचना आपोआप मंजूर होतील. (former supreme court judge reminds law minister of duty)

नरिमन पुढं म्हणाले की, या प्रक्रियेविरोधात कायदामंत्र्यांकडून करण्यात आलेली टीका मी ऐकली. मी कायदामंत्र्यांना आश्वस्त करतो की, राज्यघटनेची दोन घटनात्मक मूलभूत तत्त्वे आहेत, जी त्यांनी जाणून घेतली पाहिजेत. एक म्हणजे, किमान पाच अनिर्वाचित न्यायाधीशांना घटनापीठ म्हणतात. राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी हे विश्वासार्ह आहेत. एकदा त्या पाच किंवा त्याहून अधिक जणांनी राज्यघटनेचा अर्थ लावल्यानंतर त्या निर्णयाचे पालन करणे हे कलम १४४ अन्वये प्राधिकरण म्हणून आपले कर्तव्य आहे.

दरम्यान आपण इच्छित असल्यास त्यावर टीका करू शकता. एक नागरिक म्हणून मी त्यावर टीका करू शकतो, काहीही असो, पण हे कधीही विसरू नका की मी आज एक नागरिक आहे, एक अधिकारी म्हणून आणि एक प्राधिकरण म्हणून आपण त्या निर्णयास बांधील आहात. मग ते योग्य असो वा अयोग्य, अशी आठवणही नरिमन यांनी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT