death of 48 corona sufferers sent to private hospital in lucknow up 
देश

खासगी रुग्णालयात पाठविलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. लखनौमधील चार खासगी रुग्णालयांमध्ये 48 कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. पण, 48 पैकी 48 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना बाधित रूग्णांच्या तपासणी आणि उपचारामध्ये 4 खासगी रुग्णालयात गंभीर दुर्लक्ष झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील चार खासगी रुग्णालयात कोरोनाच्या 48 रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला आहे, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात डीएम अभिषेक प्रकाश यांनी चार खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली असून, अहवाल मागवला आहे. अहवाल हाती आल्यानंतर कारवाई केली जाईल. नोटीसमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, 'रुग्णांकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणाऱ्या आणि त्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रुग्णालयांवर महामारी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.'

शहरामधील चरक रुग्णालयात 10 कोरोना संक्रमित रुग्णांचा एकावेळी जीव गेला आहे. चंदन रुग्णालयात पाठवलेल्या 11 रुग्णांचा जीव गेला. अपोली हॉस्पिटलमध्ये 17 कोरोना संक्रमित रुग्णांचा एकाचेवेळी जीव गेला. या रुग्णालयात पाठवल्या जाणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबत हलगर्जीपणा झाला असल्याचे समोर आले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात भरती होताच रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत नेमके काय चुकत आहे? याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश्वरी मुंडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT