Death of injured youth in conflicts with security forces
Death of injured youth in conflicts with security forces 
देश

सुरक्षा दलांशी संघर्षातील जखमी युवकाचा मृत्यू 

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दले आणि निदर्शकांमधील संघर्षादरम्यान कथितरीत्या सुरक्षा दलांच्या गाडीखाली आल्यामुळे जखमी झालेल्या युवकाचा आज येथे रुग्णालयात मृत्यू झाला. 

दरम्यान, या प्रकरणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हत्येचा प्रयत्न आणि दंगलीबद्दल दगडफेक करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध, तसेच भरधाव गाडी चालविल्याबद्दल केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या चालकाविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. 

पोलिसांनी सांगितले, की श्रीनगरच्या फतहकदल भागातील रहिवासी 21 वर्षीय कैसर भर काल (शुक्रवारी) नौहट्टा भागातील निदर्शनांदरम्यान कथितरीत्या सुरक्षा दलांच्या गाडीखाली आल्यामुळे जखमी झाला होता. यामध्ये अन्य एक युवकही जखमी झाला होता. दोन्ही जखमींना सौराच्या एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान कैसरचा मृत्यू झाला. 

नोहट्टा भागातील जामिया मशिदीत काल शुक्रवारची नमाज झाल्यानंतर काही युवकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली होती. या दरम्यान ही दुर्घटना घडली. 

श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा 
युवकाच्या मृत्यूनंतर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी खबरदारी म्हणून श्रीनगर शहराच्या काही भागांत आज अनेक सेवांवर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली असून, दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग, कुलगाम, पुलवामा आणि शोपियॉं या जिल्ह्यांत इंटरनेटचे स्पीड कमी करण्यात आले आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT