Corona Vaccination Sakal
देश

लशीनंतर मृतांचे प्रमाण ०.०१ टक्के; देशात आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू

लसीकरणानंतर प्रकृतीवर प्रतिकूल परिणामाच्या २६ हजार २०० केसेसची नोंद देशात झाली. यातील केवळ ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - लसीकरणानंतर (Vaccination) प्रकृतीवर प्रतिकूल परिणामाच्या (Effect) २६ हजार २०० केसेसची (Cases) नोंद देशात (India) झाली. यातील केवळ ४८८ रुग्णांचा मृत्यू (Patient Death) झाला. २३ कोटी ५० लाख डोस (Dose) घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ ०.०१ टक्के इतकी अत्यल्प आहे. यावरून लस घेणे सुरक्षितच असल्याचा मुद्दा अधोरेखित झाला. (Death Percentage Minor after Vaccination in India)

एका वृत्तवाहिनीने १६ जानेवारी ते सात जून दरम्यानची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळविली. लस घेतलेल्या दर दहा हजार व्यक्तींमागे केवळ एकाला त्रास झाला, तर दर दहा लाखांमागे केवळ दोघांचा मृत्यू झाला हे याचे मुख्य मुद्दे आहेत.

एइएफआय म्हणजे काय

लस घेतल्यानंतर प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाल्यास संबंधित रुग्ण एईएफआयची केस ठरतो. वैद्यकीय परिभाषेत त्यास अॅडव्हर्स इव्हेंट््स आफ्टर इम्युनायझेशन (एइएफआय) असे संबोधले जाते.

एकूण तीन प्रकार

1) सामान्य किंवा किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांना ताप, अंगदुखीच्या वेदना आणि इंजेक्शन दिलेल्या जागी सूज, चिडचिड असा त्रास होतो.

2) पुढील प्रकार तीव्र असतो ज्यात रुग्णांना अंगदुखी आणि सूज असा त्रास होतो. इंजेक्शन दिलेल्या भागाजवळील स्नायूबंधाला वेदना होतात. तापाची तीव्रता जास्त असते.

3) गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते किंवा त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना शारीरिक दुबळेपणा येतो.

एइएफआय केसेसचे स्वरूप

  • ९५% (२४, ९०१) किरकोळ

  • २% (४१२) तीव्र

  • ३.३९% (८८७) गंभीर

  • ८.८५% (२३१८) रुग्णालयात दाखल करण्याची गरज

  • १६.५१% (४२३०)सहव्याधींची पार्श्वभूमी

  • ४५ टक्के (११८५९) लसीनंतर ताप हे मुख्य कारण

डोस आणि केसेसचे प्रमाण

  • ५४७ - कोव्हीशील्डचा डोस

  • २० - कोव्हॅक्सिनचा डोस

  • ११ - डोसचा तपशील नाही

  • ०.०००२१७% कोव्हीशील्ड डोस आणि मृतांची टक्केवारी (लस घेतलेल्या दर दहा लाख व्यक्तींमागे केवळ दोन)

  • ०.००००८% कोव्हॅक्सीन डोस आणि मृतांचे प्रमाण (लस घेतलेल्या दर दहा लाख व्यक्तींमागे केवळ एकाहून कमी व्यक्ती)

  • ०.०००२०% एकूण डोस आणि मृतांचे प्रमाण (लस घेतलेल्या दर १० लाख व्यक्तीं केवळ दोन)

डोसनंतर त्रासाचा कालावधी

  • २५.०४% (६,५६०) ३० मिनिटांत त्रास

  • ६८% (१७,८७५) अर्ध्या तासानंतर त्रास (इतर केसेचा तपशील उपलब्ध नाही)

  • ८७.८७% (२३,०२२) पहिल्या डोसनंतर त्रास

  • १४.१९% (३,७१८) दुसऱ्या डोसनंतर त्रास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT