Death Threat to PM Modi Esakal
देश

Death Threat to PM Modi: इंग्लंडमधून आलेल्या फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; काय आहे प्रकरण

Death threat to Prime Minister Narendra Modi over phone call from England; What is the matter: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Death Threat to PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडून देण्याची धमकी दिली आहे. खालिस्तानी संघटनेने धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर ६ दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये काय म्हटलंय?

"आज 11 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजून 18 मिनिटांनी +447537168320 या क्रमांकावरून मला फोन आला. कॉल वर युनायटेड किंगडम असे नमूद आहे. या कॉल मध्ये स्वतः खलिस्थान समर्थक दर्शवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी दिली. या कॉल मध्ये करण्यात आलेली सर्व वक्तव्य भारत विरोधी आहेत. या कॉलचा तपास करण्यात यावा आणि देशविरोधी शक्तींना आवर घालण्याची उचित कारवाई करावी".

काही दिवसांपुर्वी मोदींना सोशल मिडीयावरून आली होती धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मोहम्मद रसून कद्दरे या व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : मुलुंड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

Pune Kolhapur Highway accident : पुणे -कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT