नवी दिल्ली - गेले तीन-चार महिने देशात पुन्हा हाहाकार उडवणाऱ्या कोरोनाच्या साथीने सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय उतरता कल दिसण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवी रूग्णसंख्या ३२, ९८१ वरून घसरून २६५६७ झाली.
ऑगस्टनंतर देशात विशेषतः दिल्ली व महाराष्ट्रासह सहा राज्यांत या जीवघेण्या कोरोनाची नवी लाट आली होती ती आता ओसरणे सुरू झाल्याचे चित्र आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य मंत्रालयानुसार देशातील एकूण रूग्णसंख्या ९७ लाख ०३ हजार ७७० झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा १ लाख ४० हजार ९५८ वर पोचला आहे. २० जुलैनंतर म्हणजे तब्बल १४० दिवसांनी प्रथमच देशातील एकूण दैनंदिन रूग्णसंख्या ४ लाखांच्या खाली म्हणजे ३ लाख ८३ हजार ८६६ वर पोहोचली. बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रूग्णांपेक्षा जास्त असल्याचेही पुन्हा दिसत आहे. आज ३९,०४५ जमांनी कोरोनावर मात केली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाचा कहर
७ ऑगस्ट ः २० लाखांपेक्षा जास्त
२३ ऑगस्ट ३० लाख
५ सप्टेंम्बर ४० लाख
१६ सप्टेंबर ५० लाख
२८ सप्टेंबर ६० लाख
११ ऑक्टोबर ७० लाख
२९ ऑक्टोबर ८० लाख
२० नोव्हेंबर ९० लाखांच्या वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.