rajnath singh main.jpg 
देश

शस्त्र पूजा करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

नथुला पास- चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्किममध्ये भारतीय लष्कराबरोबर दसरा साजरा केला. राजनाथ सिंह हे रविवारी (दि.25) सकाळी दार्जिलिंग येथील सुकना सुकमा वॉर मेमोरियलवर पोहोचले आणि त्यांनी तिथे 'शस्त्र पूजा' केली. 

'भारत-चीनच्या सीमेवरील तणाव संपुष्टात यावा, अशी भारताची इच्छा आहे. शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. परंतु, कधी-कधी वाईट घटना घडतात. मला पूर्ण विश्वास आहे की, आमचे जवान कोणत्याही परिस्थितीत भारताची एक इंचही जमीन दुसऱ्याच्या हाती जावू देणार नाहीत,' असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. यावेळी राजनाथ सिंह यांनी सिक्किम येथे बीआरओकडून तयार करण्यात आलेल्या एक्सल रस्त्याचे ई-उद्घाटन केले. 

राजनाथ सिंह यांनी सकाळी दार्जिलिंग येथील सुकना वॉर मेमोरियल येथे 'शस्त्र पूजा' केली. यावेळी भारतीय लष्कराचे प्रमूख मुकुंद नरवणे हेही उपस्थित होते. तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी वॉर मेमोरियलवर श्रद्धांजली अर्पण करत वीर जवानांचे स्मरण केले. 

त्याआधी राजनाथ सिंह यांनी टि्वट करुन देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या पवित्र दिवशी मी सिक्किम येथील नथूला येथे जाऊन भारतीय लष्करातील जवानांची भेट घेणार असून तिथे शस्त्र पूजनातही सहभागी होणार आहे, असे सांगितले. ते विशेष विमानाने लष्कर प्रमुखांसह सिक्किमला आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino 2026 : भारतातील हवामानात मोठा बदल ! डिसेंबरमध्ये उष्णता वाढणार, कुठे उकाडा तर कुठे पुराची भीती; एल निनो चार दशकांतील विक्रम मोडणार?

टायगरवर गोळीबार, सलमानला धमकी...; गुजरातमध्ये तुरुंगात असूनही लॉरेन्सची चौकशी कठीण, केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश ठरतोय अडथळा

Latest Marathi News Live Update : मराठा समाजाला न्याय देण्यात एकनाथ शिंदे यांचेही योगदान- रामदास कदम

Manoj Jarange Audio Clip: ''तो तुम्हाला गिळून टाकेल..'' जरांगेंनी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला; ग्रुप बैठकीची धक्कादायक क्लिप...

माधुरी दीक्षितच्या मुलांचं करिअर काय? निवडली वेगळी वाट; लेकांच्या करिअरबद्दल बोलताना म्हणाली...

SCROLL FOR NEXT