

Latest Marathi Live Update News
esakal
चीनच्या ताब्यातील तिबेटमध्ये गुरुवारी रात्री शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. उत्तर तिबेटमधील नागकू परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या घटनेनंतर परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.