Defence Secretary Ajay Kumar tests coronavirus positive 
देश

भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत असून आता कोरोनाग्रस्तांचा आकडाही २ लाखांच्या पार गेला आहे. अशातच भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अजय कुमार यांचा कोरोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ते सध्या होम क्वारंटाइन आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अजय कुमार यांना सौम्य ताप आला होता व त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यामुळे टेस्ट करण्यात आली. मंगळवारी त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अजय कुमार यांना करोनाची बाधा झाल्यानंतर ३५ अधिकारी होम क्वारंटाइन झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाने अजय कुमार यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु केला आहे. साऊथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्याचे निर्जतुकींकरण करण्यात आले आहे.
---------
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
---------
तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीन चाललंय काय?
---------
अजय कुमार हे कोरोनाची बाधा झालेले सरकारमधील ते पहिले वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली. मागील २४ तासांत ९ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात वाढलेली ही सर्वाधिक संख्या आहे. मागील २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामळे मृत्यू झालेल्यांची संख्याही सहा हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत सहा हजार ७५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. २४ तासांत ९ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची वाढ झाल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या दोन लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख ४ हजार १०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक लाख सहा हजार ७३७ जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक; डिजिटल हल्ल्याने खळबळ, समर्थक आक्रमक!

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Marathi Live News update: अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा, दुसऱ्या दिवशीही गोंधळ

Konkan Heritage: कोदवली येथे तीन मराठाकालीन शिलालेख; फेब्रुवारी १८४५ मध्ये झाला श्री शंकरेश्वराचा जीर्णोद्धार, बंदर प्रशासनाचा इतिहास

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

SCROLL FOR NEXT