इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून सकाळ
देश

डेहराडून : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा ४ जूनला

मागील परीक्षेपासून या प्रवेश पात्रता परीक्षेत मुलींनाही सहभागी होता येत आहे.

मीनाक्षी गुरव -GMinakshi_Sakal

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा’ (आरआयएमसी) ४ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये इयत्ता आठवीसाठी ही प्रवेश पात्रता परीक्षा आहे. यापूर्वी ही परीक्षा फक्त मुलांसाठीच होती. परंतु मागील परीक्षेपासून या प्रवेश पात्रता परीक्षेत मुलींनाही सहभागी होता येत आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे वय हे १ जानेवारी २०२३ रोजी अकरा वर्ष सहा महिने यापेक्षा कमी आणि १३ वर्षापेक्षा अधिक नसावे. तसेच विद्यार्थी १ जानेवारी २०२३ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण झालेला असावा. ऑनलाइन पद्धतीने पैसे भरून परीक्षेसाठी कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून अर्ज (आवेदनपत्र) मागविण्यासाठी ‘www.rimc.gov.in’ या संकेतस्थळावर मागणी करता येईल. आवेदनपत्र परिपूर्णपणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत पत्त्यांवर २५ एप्रिलपर्यंत पोचतील, अशा पद्धतीने स्पीड पोस्टाने किंवा समक्ष येऊन जमा करावीत, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.

लेखी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षेची तारीक मौखिक परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांना यथावकाश कळविण्यात येईल, असेही दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक : वार, तारीख : शनिवार, ४ जून २०२२

  • विषय : वेळ : गुण

  • गणित : सकाळी ९.३० ते ११ : २००

  • सामान्य ज्ञान : दुपारी १२ ते १ : ७५

  • इंग्रजी : दुपारी २.३० ते ४.३० : १२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी विरेंदर बसोया न्यायालयात हजर

तू कोणाचातरी मर्डर करायला हवा होतास... अंकुर वाढवेला मित्राने सांगितलेलं असं काही; जेवायला बोलावलं आणि...

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT