A boy clinging to an electric pole in a flooded river during the Dehradun flood, moments before being rescued.
esakal
Dehradun Flood: Dramatic Rescue Video Emerges: देहरादूनमध्ये नदीला पूर आलेला असताना, एक मुलगा अडकला. यामुळे हे भयानक दृश्य पाहणाऱ्यांचा अक्षरशा थरकाप उडाला होता. मात्र सुदैवाने एडीआरएफचे जवान देव रूपाने आले आणि त्या मुलाचा जीव वाचवला. हे सगळं दृश्य पाहताना अक्षरशा सगळ्यांचा श्वास रोखलेला होता.
उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे. दरम्यान येथील प्रेमनगरच्या थरकपूर येथे स्वर्ण नदीच्या पुरात एक मुलगा अडकला होता. एनडीआरएफने मुलाला सुरक्षितपणे वाचवले आहे. एनडीआरएफच्या एका जवानाने दोरीच्या मदतीने मुलाला बाहेर काढले.
सोमवारी नदीची पाण्याची पातळी खूप जास्त असताना ही कारवाई करण्यात आली. एनडीआरएफच्या पथकाने मुलाला प्रथमोपचार देऊन सुरक्षित ठिकाणी नेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे लोक एनडीआरएफच्या या धाडसी कामगिरीचं कौतुक करत आहेत.
याशिवाय, काही लोक एका नदीत वाहून गेल्याचे समोर आले होते, आता प्राप्त माहितीनुसार त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. देहरादूनच्या प्रेम नगरमधील लॉ कॉलेजजवळील एक पूल वाहून गेला आहे. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत आणि सुमारे ४०० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.