vaccination-of-children 
देश

कोरोनामुळे मुलांच्या लसीकरणास विलंब; बालकांच्या आरोग्यावर परिणामाची भीती

पीटीआय

नवी दिल्ली - लहान मुलांना वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी विविध लसींचे डोस देण्यात येतात. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटात मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी पालक त्यांना लसीकरणासाठी रुग्णालयात नेण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेळेवर लसीकरण न केल्यास मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लसीकरणाचे वेळापत्रक पालकांनी पाळणे आवश्‍यक असून, विशेषतः एक वर्षापर्यंतच्या मुलांना नियमित वेळी लस देणे चुकवू नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दिल्लीतील वसंत कुंजमधील फोर्टीज रुग्णालयाचे संचालक व बालरोगतज्ज्ञ राहुल नागपाल म्हणाले की, मुलाला पोलिओची लस देण्यासाठी पालक तीन महिन्यांनंतर काल माझ्याकडे आले होते. काही विशिष्ट लशींच्या वेळा तुम्ही पुढे ढकलू शकत नाहीत. उदा. रोटाव्हायरस लशीचा कालावधी मर्यादित असतो. वेळेत लसीकरण केल्यास त्याचा प्रभाव जास्त असतो. 

मेडिओर रुग्णालयाच्या बालरोग व नवजात शिशू विभागाच्या प्रमुख व वरिष्ठ सल्लागार विनीत कवात्रा म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाउन लागू केलेल्या तीन-चार महिन्यात खूप कमी पालक मुलांना लसीकरणासाठी घेऊन आले होते. कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती हे त्या मागील प्रमुख कारण होते. शिवाय त्या काळात दवाखाने बंद होते. अजूनही मुलांना लस देण्यास पालक तयार नसून हे त्यात विलंब लावला जात आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉक्टर म्हणाले...
नवजात बालकाला वर्षापर्यंत लस वेळेत देणे महत्त्वाचे
न्यूमोनिया, पोलिओ, डीपीटी, गोवरची लस वेळेतच द्यावी
सामान्य स्थितीत लसीला सात दिवस उशीर चालू शकतो
बाळांना दुसऱ्या वर्षात बूस्टर लस देणेही आवश्‍यक, त्यास विलंब झाला तरी धोका नसतो
दुसऱ्या वर्षात एक व दोन महिन्यांचा विलंब होणे मान्य, मात्र त्यापेक्षा उशीर करू नये

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या दीड वर्षाच्या मुलीला ऑगस्टमध्ये लस द्यायची होती. पण, कोरोनामुळे तिला दवाखान्यात नेण्याची भीती वाटल्याने आम्ही तिचे लसीकरण पुढे ढकलले आहे.
- संध्या, दिल्लीतील पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT