CCTV Footage  Sakal
देश

CCTV Footage : भरदिवसा उद्योजकाला लुटलं; 4 बंदुकधाऱ्यांनी कार अडवून टाकला दरोडा

ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्लीत भरदिवसा चार गुंडांनी एका उद्योजकाला लुटल्याची घटना घडली आहे. भरसस्त्यात दिवसा कार अडवून बंदुकीचा धाक दाखवून गुंडांनी दा दरोडा टाकला असून ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, इंडिया गेटला रिंग रोडने जोडणाऱ्या प्रगती मैदान टनेलजवळ ही घटना घडली आहे. डिलीव्हरी एजंट दोन लाख रूपयांची रोकड घेऊन गुरूग्रामला जात असताना ही घटना घडली असल्याची माहिती आहे. गाडी जात असताना दोन दुचाकीवरून चार दरोडेखोर येतात आणि भर रस्त्याच्या मध्येच चारचाकी गाडीला थांबवतात.

त्यानंतर दोघेजण गाडीवरून उतरतात आणि बंदुकीचा धाक दाखवून गाडीचा दरवाजा खोलतात आणि पैशांची बॅग घेऊन पलायन करतात. हा थरारक प्रसंग पाहून इतर वाहनेसुद्धा पुढे निघून जात असताना यामध्ये दिसत आहेत.

दरम्यान, नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून दरोडेखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी एलजीचा राजीनाम्याची मागणी केली आहे. "तुम्ही दिल्लीला सुरक्षित ठेवू शकत नसाल तर सूत्रे आमच्या हातात द्या, दिल्लीला सुरक्षित कसं ठेवायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो." असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT