aiims 
देश

कोरोनात आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर; AIIMS च्या 5 हजार नर्सेस संपावर

सकाळवृत्तसेवा

दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) नर्सेसच्या संघटनेने आपल्या मागण्यांसाठी काम बंदचे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात जवळपास 5 हजार नर्सेस सामिल झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या नर्सेसना कोरोनाच्या कठीण काळात आंदोलन करु नका आणि कामावर परत या, असं आवाहन केलं आहे. तसेच त्यांच्या मागण्यांवर जरुर विचार केला जाईल, असंही आश्वासन देण्यात आलं आहे.  

आजपासून सुरु झालेल्या या कामबंद आंदोलनात नर्सेस मोठ्या संख्येने समाविष्ट झाल्या आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये सहाव्या केंद्रीय वेतन आयोगासंबंधीच्या मागणीचा देखील समावेश आहे. या नर्सेसचं म्हणणं आहे की, बऱ्याच मोठ्या काळापासून त्यांच्या या मागण्या प्रलंबित आहेत. त्यांच्या या मागण्यांबाबत याआधी सरकारकडून आश्वासन दिले गेले होते मात्र, त्यांच्या या मागण्या अद्याप अनुत्तरितच राहिल्या आहेत.

याबाबत एम्सचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या कठीण काळात नर्सेसच्या संघटनेने याप्रकारे कामबंद आंदोलन करणे दुर्दैवी आहे. अवघ्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची लस येते आहे, त्यापूर्वीच याप्रकारचे आंदोलन होणे अपेक्षित नव्हते. मी या नर्सेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी हे आंदोलन करु नये. तसेच त्यांनी कामावर परत यावं. या कोरोना महामारीच्या काळात मदत करणे आवश्यक आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, याआधी नर्सेस संघटनेने आपल्या मागण्या मांडल्या होत्या. त्यांना एम्सकडून सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले गेले होते. कोरोना महामारीच्या कठीण संकटात आपलं कर्तव्य सोडून याप्रकारे नर्सेस आंदोलनावर जाऊ शकत नाहीत. मी सर्वांना आवाहन करतो की ठरलेल्या नियोजनानुसार काम सुरु करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT