Delhi AQI Updates Esakal
देश

Delhi AQI Update: धुकं आणि प्रदूषणामुळे दिल्लीतील AQI पुन्हा 400 वर! थर्टी-फर्स्टच्या आतषबाजीमुळे आणखी धोका

Delhi AQI Updates: उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा आलेख सातत्याने घसरत चालला आहे आणि नवीन वर्षाच्या उत्सवामुळे हवेची गुणवत्ता आणखीनच बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Delhi AQI Updates: दिल्लीत कडाक्याच्या थंडीसोबतच हवेची गुणवत्ता देखील खराब होताना दिसत आहे. दिल्लीतील लोकांना विषारी हवेचा श्वास घ्यावा लागत आहे. हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब श्रेणीत पोहोचली आहे. शनिवारी पुन्हा एकदा AQI 400 च्या जवळ पोहोचला आहे. वाढत्या थंडीमुळे तापमानात सातत्याने घसरण होत असून आजूबाजूला दाट धुके पसरण्याची शक्यता आहे. यामुळेच AQI वाढण्याची अपेक्षा आहे. शिवाय, नववर्षाच्या उत्सवात फटाक्यांची आतषबाजीही शहराची हवा खराब करू शकते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही परिस्थिती आणखी किमान तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांनी फटाके फोडले तर हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे. दिल्लीत फटाक्यांवर पूर्णपणे बंदी असली तरीही पण त्याचा परिणाम दिसून येत नाही. नवीन वर्षाच्या निमित्ताने लोक फटाक्यांची आतषबाजी करू शकतात.

तीन दिवसांपासून दिल्लीची हवा खराब

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीतील २४ तासांची सरासरी AQI ४०१ वर पोहोचली. हे 'धोकादायक' झोनमध्ये आहे. दुपारी 4 पर्यंत, AQI 'अत्यंत खराब' स्तरावर पोहोचला, 400 वर पोहोचला. शहराचा AQI शुक्रवारी दुपारी 4 वाजता 382 (खूप खराब) आणि गुरुवारी 358 (अत्यंत खराब) होता. मात्र नवीन वर्षाचे सेलिब्रेशन पाहता ते सहज 400 पार करण्याचा धोका आहे.

हवेची गुणवत्ता का खालावली?

हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवेची गुणवत्ता खराब होण्याचे कारण गेल्या दोन दिवसांपासून शहरातील दिवसाचे तापमान कमी होत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, 'कमी तापमान आणि वाऱ्याचा कमी वेग यामुळे वातावरणात स्थिरता येते. दिवसभरातही क्वचितच सूर्यप्रकाश असल्याने वाऱ्याचा वेग मंदावला, त्यामुळे प्रदूषकांना पसरण्याची संधी मिळाली नाही. आगामी काळात परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही.

दिल्लीची हवा कशी असेल?

केंद्र सरकारच्या 'अर्ली वॉर्निंग सिस्टम'ने म्हटले आहे की, 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. सध्या प्रदूषकांच्या प्रसारासाठी हवामान अनुकूल नाही. मात्र ३१ डिसेंबरला जाळण्यात आलेल्या फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता बिघडू शकते.

थंडी आणि धुक्याचा प्रभाव राहणार

पुढील दोन ते तीन दिवस दिल्लीत थंडी आणि धुके समान प्रमाणात पाहायला मिळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. किमान आणि कमाल तापमानात घट झाल्यामुळे दिल्लीत कडाक्याची थंडी पडणार आहे. धुक्यामुळे आधीच वाहतुकीवर परिणाम झाला असून आगामी काळातही धुक्यापासून दिलासा मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT