ganesh idols sakal
देश

गणेशाच्या आशीर्वादानेच लव्ह जिहादचा अंत होईल विहिंपचे साकडे

विहिंपच्या वतीने दिल्ली व परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमप्रकरणांतून अल्पववयीन मुलींवर होणारे प्राणघातक हल्ले वाढले असून गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच या ‘लव्ह जिहाद'पासून देशाला मुक्ती मिळावी असे साकडे विश्व हिंदू परिषदेने घातले आहे.विहिंपच्या वतीने दिल्ली व परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नेहरू नगर येथील सनातन वेद गुरुकुल येथे यानिमित्त भव्य गणेशमूर्तीसह १०८ लहान मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली होती, यानिमित्त रोज पहाटे मंत्रघोषात पूजा करण्यात आणि सायंकाळी भजन संध्या आयोजित करण्यात आली. यानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेतही हजारो भाविक सहभागी झाले होते.

झारखंडमध्ये अलीकडंच एका तरूणाने विद्यार्थिनीला पेट्रोल टाकून जाळले. त्यापाठोपाठ दिल्लीतही एका विद्यार्थिनीवर गोळीबार झाला. संगम विहारच्या वीर सिंग की कोठी भागात अली नावाच्या किशोरवयीन मुलाने नयना मिश्रा या ११ वीच्या विद्यार्थिनीवर भरदिवसा गोळीबार केला. ही विद्यार्थिनी सुदैवाने बचावली मात्र तिच्या खांद्यात गोळी रुतून बसली आहे. दिल्ली पोलिसांनी अलीसह तिन्ही आरोपींना पकडले आहे.

विहिंपच्या बैठकीत, हिंदू समाजाने एकजुटीने अशा राक्षसी शक्तींचा नायनाट करण्याची वेळ आल्याचे विहिंपच नेते नंदकिशोर, सुरेंद्र जै, कपील खन्ना आदींनी केले. लव्ह जिहादच्या घटना देशात पुन्हा वाढू लागल्या आहेत. संघटित शक्तीनेच या घटनांचा मुकाबला करण्यात येईल. गणेशाच्या आशीर्वादाने या वृत्तींचा नाश होईल त्यासाठी बाप्पाने हिंदू बांधवांना शक्ती व आशीर्वाद द्यावा असे मागणे विहिंपच्या वतीने गणेशाजवळ करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT