Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal: 8 समन्सनंतर केजरीवाल पहिल्यांदाच नमले! ईडीला उत्तर देण्यास तयार, दिली तारीख

Arvind Kejriwal sends reply to ED: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच ईडीसोबत सहकार्य करण्याची भाषा केली आहे. त्यांनी सक्तवसुली संचालनालयाला उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच ईडीसोबत सहकार्य करण्याची भाषा केली आहे. त्यांनी सक्तवसुली संचालनालयाला उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, त्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगचा पर्याय समोर ठेवला आहे. शिवाय १२ मार्चनंतरची तारीख देण्यास सांगितलं आहे.( Arvind Kejriwal sends reply to ED summons ready to answer after March 12)

केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर होण्यास नकार दिला आहे. तब्बल आठवेळा त्यांना ईडीने समन्स पाठवलाय. कोर्टात देखील हे प्रकरण गेलं आहे. आता कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी उत्तर देण्यास केजरीवाल तयार झाले आहेत. पण, त्यांनी एक अट ठेवलीये. ते व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ईडीच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास तयार आहेत. तसेच त्यांना १२ तारखेनंतर तारीख देण्यास सुचवलं आहे.

ईडीने केजरीवाल यांना २७ फेब्रुवारी रोजी आठवा समन्स पाठवला होता. त्यांना ४ मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण, केजरीवाल यांनी आठव्यांदा ईडी समोर हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ईडीचा समन्स अवैध असल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. त्यांनी ईडीला पत्र लिहून समन्स मागे घेण्याची मागणी केली होती.

अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येईल अशी भीती आम आदमी पक्षाला आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून उत्तर देण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जातंय. यापूर्वी केजरीवाल यांनी ईडीला सहकार्य करण्यास नकार दिला होता. पण, आता त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

Maharashtra Monsoon: मान्सून ज्याच्यामुळे रखडला ते सोमाली जेट आहे काय?

Groundwater Protection: पुणे जिल्ह्यात धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण व बेकायदेशीर बोअरवेलवर नियंत्रणाची मागणी; भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांचा आग्रह

माढा कसबा पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल Madha Vitthal Temple restoration: मंदिराला प्राचीन रूप परतवण्यासाठी सॅंड ब्लास्टिंगद्वारे रंग काढण्याचे काम; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

SCROLL FOR NEXT