Pune Bangalore Highway Traffic Diversion : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद; कोल्हापूर -पुणे प्रवास करायचायं तर हे आहेत पर्यायी मार्ग, थांबलेल्या वाहनांना शेतकऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था

Kolhapur Pune Alternative Routes : राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाक्यावर सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. कोल्हापूरहून पुण्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या.
Pune Bangalore Highway Traffic Diversion

Pune Bangalore Highway Traffic Diversion

esakal

Updated on: 

Pune Bangalore Highway Closed : उसाला प्रतिटन पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवसही चक्का जामने गाजला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या दिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवसभर आंदोलन सुरू राहूनही राज्य सरकार आणि साखर कारखानदारांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने शेतकरी संतप्त झाले असून, आजपासून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Karad Satara highway traffic update
Pune Bangalore Highway Traffic raju shetti kini toll naka
Pune Bangalore Highway Traffic
Kognoli Toll Protest