भाजप टिम ई सकाळ
देश

BJP : कॉंग्रेस मुख्यालयाजवळ दिल्ली भाजपची निदर्शने

कॉंग्रेसचा जाहीरनामा देशाच्या संस्कृतीचा अपमान करणारा असल्याचे यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाच्या विभाजनाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करत दिल्ली प्रदेश भाजपकडून २४, अकबर रोड या कॉँग्रेसच्या मुख्यालयाजवळ बुधवारी निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेसचा जाहीरनामा देशाच्या संस्कृतीचा अपमान करणारा असल्याचे यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसजसा पुढे सरकत चालला आहे, तसतशी कॉँग्रेस आणि भाजप यांच्यादरम्यानची आरोप-प्रत्यारोपांची धार वाढत चालली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा ठराविक वर्गाचे लांगुलचालन करणारा असून कॉँग्रेस सत्तेत आली तर लोकांची संपत्ती हिसकावून घेतली जाऊ शकते. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी वर्गाचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिमांना दिले जाईल, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांद्वारे केला आहे. यावर पराभव समोर दिसत असल्यामुळे पंतप्रधान खोटे बोलत असल्याचे कॉँग्रेसकडून सांगितले जात आहे.

राहुल गांधी हे देशाच्या विभाजनाचे राजकारण करीत असून या पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचे प्रतिबिंब दिसून येते, असे सांगत भाजपने कॉँग्रेस मुख्यालयाजवळ निदर्शने केली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूघ, दिल्ली प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रिचा पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचे दागिने हिसकावून घेऊन ते अल्पसंख्यांकाना देण्याचा कॉँग्रेसचा कट असल्याचा आरोप यावेळी तरुण चूघ यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोरून अपहरण, २ हजार मृत्यूंचं गूढ अन्...; कोण होते 'सतलुज'चे खरे नायक जसवंत सिंह खालरा?

"We Want Sanju!"; चाहत्यांची नारेबाजी... गौतम गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला, तिलक वर्माही सोबत होता; Viral Video

'मलाही माहितेय की तो कसा आहे?' अंकुश चौधरीबद्दल दीपा परब म्हणाली, 'आम्ही नवरा बायको होण्याअगोदर...'

Wari Prasthan 2026:आषाढी वारीसाठी पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय ? प्रस्थानत्रयी म्हणजे काय ?

Ulhas River: धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली इशारा पातळी; कल्याण-डोंबिवलीकरांवर पुराचे संकट, प्रशासनचा हाय अलर्ट

SCROLL FOR NEXT