Arvind Kejriwal Google file photo
देश

दिल्लीतील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार - केजरीवाल

सूरज यादव

दिल्ली शिक्षण मंडळाचा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी करार झाला असून याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

नवी दिल्ली - दिल्ली शिक्षण मंडळाचा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी आज बुधवारी करार झाला. दिल्लीतील लोकांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट असून आता दिल्लीतील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळेल अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

आज दिल्लीच्या नागरिकांसाठी विशेषत: लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आम्ही महत्त्वाची घोषणा करतोय. काही दिवसांपूर्वी आम्ही दिल्ली बोर्ड ऑफ स्कुल एज्युकेशनची स्थापना केली होती. प्रत्येक राज्याचं शिक्षण मंडळ आहे. या धर्तीवर दिल्लीत शिक्षण मंडळाची आम्ही स्थापना केली होती, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

दिल्लीच्या शिक्षण मंडळाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी म्हणजेच International Baccalaureate सोबत करार केला आहे. International Baccalaureate चे जगभरातील १५९ देशांमधील शाळांसोबत त्यांचा करार झाला असून यात अमेरिका, जपान, कॅनडा अशा देशांचा समावेश आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीतील शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट आहे, असे केजरीवाल यांनी नमूद केले.

सध्या देशात शिक्षण क्षेत्रात श्रीमंत आणि गरीब वर्गासाठी शाळा आहेत. दिल्लीत आमची सत्ता आल्यापासून शिक्षणात क्रांतिकारी बदल करण्यात आले आहेत. सरकारी शाळा, तेथील सुविधा यात सुधारणा केली. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवले. यामुळे सरकारी शाळांमधील निकालात सुधारणा झाल्याचा दावाही केजरीवालांनी केला.

आंतरराष्ट्रीय बोर्डाशी कराराचे फायदे काय?

परदेशातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ दिल्लीत येतील. सुरुवातीला दिल्लीतील ३० शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या शाळांमधील शिक्षकांना हे तज्ज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. या शाळांमध्ये कोणत्या सुविधा नाहीत, याचा आढावा घेऊन त्यात सुधारणा केली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले. आता दिल्लीतील मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळणार आहे. दिल्लीतील मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उतरण्यात सक्षम असतील. अखेर यामुळे दिल्लीतून गरिबी दूर होणार आहे आणि देशाला एक नवं मॉडेल मिळणार, अशी आशाही केजरीवाल यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT