

Suryakumar Yadav Fifty in SMAT 2026
Sakal
Suryakumar Yadav's Guides Mumbai to Second Consecutive Win: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ स्पर्धेत सोमवारी (१६ नोव्हेंबर) मुंबईने गुजरातविरुद्ध ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.
सलग दुसऱ्या सामन्यात मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही वादळी अर्धशतक केले आहे.
सोमवारी कोलकाताला झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईसमोर १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग मुंबईने १५.४ षटकातच ५ विकेट्स गमावत २०१ धावा करत पूर्ण केला. मुंबईसाठी सूर्यकुमारसह सर्फराज खाननेही विस्फोटक फलंदाजी केली.