Petrol 
देश

Video : डिझेलच्या दरात मोठी कपात; तब्बल...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असताना आता दिल्लीकरांसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्लीत डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता डिझेलच्या दरात मोठी कपात होणार आहे. 

राजधानी दिल्लीत यापूर्वी डिझेलवर 30 टक्के व्हॅट आकारला जात होता. मात्र, आता यामध्ये कपात करण्यात आली असून, 16 टक्के करण्यात आला आहे. डिझेलवरील व्हॅट कमी केल्याने आता डिझेलचे दर 8.36 रुपये/प्रतिलिटर कमी झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले, की लॉकडाऊननंतर आता हळूहळू लोक कामावर परतत आहेत. ज्यांना नोकरीची गरज आहे आणि जे नोकरी देत आहेत त्यांच्यासाठी जॉब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

मी दिल्लीतील सर्व व्यापारी आणि दुकानदारांना आवाहन करतो, की सर्वांनी मिळून दिल्लीची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योगदान द्यायला हवे. त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. येत्या दिवसात व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. 

आरटी-पीसीआर टेस्ट

केजरीवाल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांना नवा आदेश जारी केला आहे. त्यांनी सांगितले, की ज्या रुग्णाची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, त्यांना कोरोनाची लक्षणे असतील तर आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे आहे.

दिल्लीत वाढताहेत बरे होणारे रुग्ण

दिल्लीच्या आरोग्य विभागानुसार, एक आठवड्यापूर्वी एकूण रुग्णांची संख्या 125509 होती आणि आता 106118 रुग्ण बरे झाले आहेत. 

दरम्यान, दिल्लीत कोरोनाची परिस्थिती आता सुधारत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी दिल्ली सरकारने बनविलेले कोविड केअर सेंटर आता बहुतांश प्रमाणात रिकामे दिसत आहे. हे दिल्लीत कोरोनावर नियंत्रण आणल्याचे मोठे संकेत आहेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT