Delhi Crime esakal
देश

Delhi Crime : तरुणीला फरफटत नेलेली 'ती' कार कोणाची? दिल्ली पोलिसांच्या तपासाची दिशा ठरली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः ३१ डिसेंबरच्या रात्री दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने एका तरुणीचा मृत्यू झालाय, ते पाहून देश हादरुन गेला. याप्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलेलं असून यंत्रणेला आदेश दिले आहेत. यामध्ये नवनवे खुलासे समोर येत आहेत.

ज्या कारने पीडित मृत तरुणीला फरफटत नेलं, ती कार काही तासांपूर्वीच आरोपींनी एका मित्राकडून घेतली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांवरुन टाईमलाईन बनवण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आरोपींना घटनास्थळी घेऊन जावं लागले. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर आरोपींवर कलम वाढवली जाणार आहेत.

ही घटना १ जानेवारी रोजी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनास्थळी पोलिसांना एक स्कुटी आणि बुट मिळाला होता. ही स्कुटी रेखा नावाच्या महिलेच्या नावावर होती. तिने ही स्कुटी पाच वर्षांपूर्वीच विकलेली होती.

हेही वाचाः Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

ज्या कारनं पीडितेला तब्बल १३ किमीपर्यंत फरफटत नेलं ती कार चार पोलीस स्टेशनसमोरुन गेली. सुल्तानपुरी, विजय विहार, बवना आणि कांझवाला या चार पोलीस स्टेशन्ससमोरुन या महिलेला फरफटत नेण्यात आलं. पण पोलिसांनाही ही घटना दिसली नाही याचं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना स्पष्ट निर्देश देऊन लवकरात लवकर याचा सविस्तर अहवाल सादर कराव, असं सांगितलं आहे. वरिष्ठ अधिकारी शालिनी सिंह यांना निर्देश देत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितलं की, पाच आरोपी पकडले आहेत. यामध्ये दीपक खन्ना हा गाडी चालवत होता. तो ग्रामीण सेवेत कार्यरत आहे. तर कारमध्ये अमित खन्ना, कृष्ण, मनोज आणि मिथुन हे बसले होते. याप्रकरणी पीएम रिपोर्ट उद्या येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT