Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal : सूत्रधार केजरीवालच ;ईडी

बहुचर्चित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ३७ व्या क्रमांकाचे तर आम आदमी पक्षाला ३८ व्या क्रमांकाचे आरोपी बनविण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बहुचर्चित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ३७ व्या क्रमांकाचे तर आम आदमी पक्षाला ३८ व्या क्रमांकाचे आरोपी बनविण्यात आले आहे. केजरीवाल यांनी गैरव्यवहाराचा कट रचला होता आणि तेच मुख्य सूत्रधार असल्याचे दोषारोप पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दक्षिण लॉबीला मद्य वितरणाचे परवाने देण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात लाच घेण्यात आली. लाचेचा पैसा गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला जाणार असल्याची माहिती केजरीवाल यांना होती तसेच कटात ते सामील होते, असे सांगतानाच आरोपी विनोद चौहान याच्यासोबत व्हॉट्सअपवर झालेल्या संदेश आदानप्रदानाची माहिती दोषारोपपत्रात देण्यात आली आहे. बीआरएस नेत्या के. ​कविता यांचे साहाय्यक विनोद चौहानच्या मार्फत २५.५ कोटी रुपये गोवा निवडणुकीसाठी ‘आप’पर्यंत पोहोचविण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT