CM Arvind Kejriwal get Bail Esakal
देश

Arvind Kejriwal: एक लाखाचा वैयक्तिक जातमुचलका, साक्षीदारांशी संपर्क...; केजरीवालांना या अटींवर जामीन, आज होणार सुटका

CM Arvind Kejriwal get Bail: दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीने केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करत ४८ तासांचा वेळ मागितला होता. न्यायालयाने ईडीचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. केजरीवाल आज तिहार तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

विशेष न्यायाधीशांनी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आणि 1 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले, त्यांना तपासात अडथळा आणू नये किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. अशा काही अटी घातल्या आहेत, ज्यात केजरीवाल यांनी गरज भासल्यास न्यायालयात हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायाधीशांनी दिले आहेत.

ईडीने केले हे दावे

केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान, ईडीने दावा केला की त्यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरण प्रकरणात 100 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे पुरावे आहेत. गोव्यातील 'आप'च्या निवडणूक प्रचारात दारू विक्रेत्यांकडून मिळालेली लाच वापरण्यात आल्याचा आरोपही केंद्रीय तपास यंत्रणेने केला आहे.

21 मार्च रोजी केली होती अटक

लोकसभा निवडणुकीपूर्वी २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना अटक केली होती. मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी त्यांनी आत्मसमर्पण केले.

10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला होता आणि त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करून पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे सांगितले होते. केजरीवाल यांनी २ जून रोजी तिहार तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले होते.

यानंतर त्यांनी आजारांचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला. हे ऐकून ट्रायल कोर्टाने त्यांना ५ जून रोजी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : जळगावच्या पाचोर्‍यातील पिंपळगाव पोलीसाची हातभट्टीवर मोठी कार्यवाही

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

Umarga Crime : तरुणाच्या खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक; उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

Uttarakhand : मुख्यमंत्र्यांच्या हातचा चहा पिऊन भराडीसैंणमधील लोक झाले तृप्त, CM धामींनी मॉर्निंग वॉकवेळी साधला जनतेशी संवाद

SCROLL FOR NEXT