Arvind Kejriwal  
देश

Arvind Kejriwal : ‘भूपेंद्र पटेल हे कळसूत्री मुख्यमंत्री’ ; अरविंद केजरीवाल

सकाळ वृत्तसेवा

देवभूमी द्वारका : ‘‘भूपेंद्र पटेल हे गुजरातचे कळसूत्री मुख्यमंत्री आहेत. ते साधी त्यांच्या शिपायाची नियुक्तीही करू शकत नाहीत,’’ अशी खिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उडविली.

देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजप आणि काँग्रेसचा गुप्त समझोता झाला असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली. ते म्हणाले, की गुजरातच्या जनतेपुढे दोन चेहरे आहेत. एक इसुदान गढवी यांचा अन दुसरा भूपेंद्र पटेल यांचा. तुम्ही कोणाला मत देणार? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

गढवी हे तरुण आहे, शिक्षित आहेत. त्यांना गरिबांविषयी कळवळा आहे. ते शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,‘‘ दुसऱ्या बाजूला भूपेंद्र पटेल आहेत. त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. ते कळसूत्री मुख्यमंत्री आहेत. ते चांगली व्यक्ति आहेत. ते खूप धार्मिक असल्याचे मी ऐकले आहे. पण कोणीही त्यांचे ऐकत नाहीत.’’ तुम्हाला कळसूत्री मुख्यमंत्री हवा की शिक्षित मुख्यमंत्री हवा, अशी विचारणाही केजरीवाल यांनी केली.

गुजरातमध्ये ‘आप’च्या बाजूने लाट आहे. हे कसे शक्य झाले, याचा विचार करीतच मी माझे डोळे मिटले. हात जोडले. तेव्हा कोणत्यातरी दैवी शक्तीने हे घडवून आणले असल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्या पक्षाला कृष्ण आणि देवीचे आशीर्वाद लाभले आहेत. जेव्हा पापाचा घडा भरतो, तेव्हा देव धडा शिकवतो, असे गीतेत लिहिलेले आहे.’’

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टरबाबत नवी मागणी समोर; बेसिक सॅलरीत होणार मोठी वाढ?

Satara: कऱ्हाडच्या उड्डाणपुलाचं उद्घान लांबणीवर, प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार; NHAIने कंत्राटदाराला दिले नवे आदेश

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; आज किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

‘सासूसोबत पत्रिका जुळली तरच लग्न!’ सासू-सुनेच्या नात्यातील गोडवा जपणारी 'कपबशी'ची अनोखी कथा

आमदार निधी कुठे वापरला? हिशोब मतदारांपुढे ठेवणारा लोकप्रतिनिधी; कोण होते प्रा. बी.टी. देशमुख?

SCROLL FOR NEXT