Arvind Kejriwal Sakal
देश

Arvind Kejriwal : 'मनीषजींची देव परीक्षा घेतोय; केजरीवाल यांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना दारु धोरणाच्या मुद्द्यावरून अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र तरी त्यांना आप पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की मनीष सिसोदिया 100 पैकी 100 गुणांसह लवकरच परततील.

केजरीवाल म्हणाले की, देव मनीषजींची परीक्षा घेत आहे. स्कूल ऑफ स्पेशलायझेशन एक्सलन्स अंतर्गत शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

केजरीवाल म्हणाले की, आज मनीषजी आमच्यासोबत नाहीत, काही दिवसांपूर्वी काही मुलं माझ्याकडे आली होती. मुलं म्हणाले की आम्ही मनीष सरांना मिस करत आहेत. तर मी त्यांना सांगितले की, आम्ही पण त्यांना खूप मिस करतोय, अनेक शिक्षकही येतात, शिक्षकही म्हणतात की मनीषजींना ते मिस करत आहेत. शिक्षकच सांगतात, मनीषजींवर पूर्णपणे खोटे गुन्हे दाखल केले असून त्यांना गोवण्यात आले आहे, असही केजरीवाल यांनी म्हटलं.

मनीषजींनी तुम्हाला संदेश पाठवला आहे आणि सांगितले की मी पूर्णपणे ठीक आहे, काळजी करू नका, तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तिथे बसूनही त्यांना तुमच्या अभ्यासाची आणि आरोग्याची काळजी वाटते. आपण सर्वजण जाणतो की जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता तेव्हा कधी कधी देव कुठेतरी तुमची परीक्षा घेतो. राजा हरिश्चंद्र हा महान राजा होता, त्यामुळे तो किती सत्यवादी आहे हे पाहण्यासाठी देवाने त्यांचीही परीक्षा घेतली होती, असंही केजरीवाल यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार एआय कंटेंट लेबलिंग अनिवार्य

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT