Delhi court adjourned hearing of Nirbhaya's parents seeking death warrant of all convicts
Delhi court adjourned hearing of Nirbhaya's parents seeking death warrant of all convicts 
देश

निर्भयाच्या आईच्या याचिकेवरील सुनवणी तहकूब; आता कोठे होणार सुनावणी? 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज, दिल्लीत सुनावणी होणार होती. पण, आता येत्या 18 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या आईने पटियाला हाऊस कोर्टात ही याचिका दाखल केली होती.. 

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी 23 वर्षीय निर्भयावर सामूहिक बलात्कार करून, तिची क्रूर हत्या करण्यात आली होती. यात सहा जण आरोपी होती. त्यातील एक अज्ञान होता. बाल न्यायालयात त्याच्या विरोधात खटला चालवण्यात आला. शिक्षा भोगल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली. इतर पाच आरोपींपैकी एका आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली. आता उर्वरीत चौघांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.

राम सिंह या आरोपीनं आत्महत्या केली आहे. तर मुकेश सिंह, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा यांच्या फाशी संदर्भात सातत्याने मागणी होत आहे. चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी, गेल्या सात वर्षांत या फाशीवर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं आरोपींना विनाविलंब फाशी द्यावी, अशी मागणी निर्भयाच्या आईने कोर्टापुढे याचिकेतून केली आहे. 

आम्ही सात वर्षे न्यायासाठी प्रतीक्षा केली आहे आता आणखी एक आठवडा करू. येत्या 18 डिसेंबरला आरोपींच्या विरोधात फाशीच्या शिक्षेचे आदेश निघतील, अशी मला अपेक्षा आहे. 
-आशा देवी, निर्भयाची आई

अशी झाली सुनावणी 

  • आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर करण्यात येणार 
  • सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टाकडून खबरदारी 
  • पटियाला हाऊस कोर्टाबाहेरही मोठा पोलिस बंदोबस्त
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT