LNJP Hospital 
देश

Delhi LNJP hospital : दिल्लीतील बड्या रुग्णालयात घडला लाजीरवाणा प्रकार; नवजात अर्भकाला...

डॉक्टरांच्या या लाजीरवाण्या कृतीमुळं त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : डॉक्टरांना आपल्याकडं देवाचा दर्जा दिला जातो. पण अनेकदा याच डॉक्टरांकडून बेपर्वाहीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. यामुळं डॉक्टरांची प्रतिमा मलिन झाली आहे. दिल्लीतील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (Delhi Crime News a shameful incident happened in LNJP hospital in Delhi)

या व्हिडिओनुसार, एका नवजात अर्भकावर उपचार करण्यात दिल्लीतील एका प्रतिष्ठित रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून नकार देण्यात आला. मृत्यूशी झुंज देत असलेल्या या अर्भकाला पाहण्यास देखील रुग्णालय प्रशासनानं नकार दिल्यानंतर अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या चिमुकलीवर उपचार सुरु झाले.

हे ही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील प्रतिष्ठित एलएनजेपी रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, रविवारी दुपारी २ वाजता एका चिमुकलीचा जन्म झाला. या रुग्णालयानं सुरुवातीला या मुलीला मृत घोषीत केलं आणि एका बॉक्समध्ये तिला लपेटून कुटुंबियांच्या हवाली केलं. यानंतर कुटुंबियांनी घरी आल्यानंतर पाहिलं तर त्यांना धक्काच बसला. कारण मृत म्हणून घरी आणलेली चिमुकली प्रत्यक्षात जिवंत होती. यानंतर या कुटुंबानं पुन्हा रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी या चिमुलीला पाहण्यास नकार दिला.

यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलीस उपायुक्तांना याची खबर मिळाल्यानंतर त्यांनी याची दखल घेत रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधला. यानंतर संबंधित नवजात मुलीला रुग्णालयानं दाखल करुन घेत तिच्यावर उपचार सुरु केले. त्यामुळं त्या चिमुकलीचा जीव वाचू शकला. पोलिसांच्या मदतीनं आता या चिमुकलीवर व्यवस्थित उपचार सुरु झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT