देश

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

एकीकडे प्रसिद्ध मसाला कंपन्या सरकारी यंत्रणाच्या रडारवर असताना दुसरीकडे तब्बल १५ टन बनावट मसाला जप्त करण्यात आला आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः तुम्ही घरामध्ये मसाल्यात वापरत असलेले धना पावडर, हळद पावडर आणि इतर मसाले बनावट आहेत की अस्सल हे तपासून घेण्याची गरज आहे. कारण दिल्लीमध्ये तब्बल १५ टन बनावट मसाला जप्त करण्यात आलेला आहे. मसाल्याच्या नावाखाली केवळ लाकडाचा भुसा आणि त्यात अॅसिडचा वापर करण्यात आलेला होता.

ईशान्य दिल्लीतील करावल नगर भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. दोन मसाल्यांच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात तब्बल १५ टन बनावट मसाले आढळून आले. पोलिसांनी मसाला प्रोसेसिंग युनिटच्या मालकांसह तिघांना ताब्यात घेतलं आहे.

दिलीप सिंह (वय ४६), सरफराज (वय ३२), खुर्सिद मलिक (वय ४२) आ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे लोक मसाल्यांमध्ये भेसळ करुन स्थानिक बाजारपेठेमध्ये मालाची विक्री करत होते. मूळ मसाल्यांच्या तुलनेत कमी किंमतीमध्ये हा बनावट माल विकला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बनावट मसाल्यांसह पोलिसांनी झाडांची कुजलेली पाने, खराब बाजरी आणि तांदूळ, लाकडाची पावडर, मिरचीचे खोके, अॅसिड आणि तेल जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पावेरिया यांनी याबाबत माहिती दिली.

दिल्लीमधील काही उत्पादक आणि दुकानदार हे संगनमत करुन वेगवेगळ्या ब्रँड्सचे बनावट मसाले विक्री करत होते. दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. डीसीपी पावेरिया म्हणाले की, मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आलेली आहे. एक टीम तयार करुन १ मे रोजी छापे टाकण्यात आले.

कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतलं. सिंग आणि सरफराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिंग हा कंपनीचे मालक असल्याची कबुली त्याने दिली. पुढे तपास केला असता काली खाटा रोड, करावल नगर येथे आणखी प्रोसेसिंग युनिट सापडले. तिथेच सरफराज पकडला गेला.

पकडलेल्या दोघांनी २०२१ पासून मसाल्यांचा गोरखधंदा सुर केला होता. यापूर्वी हे दोघे कपड्यांची खरेदी-विक्री करत होते. संशयितांची रवानी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT