देश

थरार! १६ वर्षीय मुलाने १७ वर्षीय मुलावर ५५ वेळा केले चाकूचे वार; मृतदेह रस्त्यावर आणून केलं नृत्य

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील एका १६ वर्षीय मुलाने एका १७ वर्षीय मुलाला अमानुष पद्धतीने मारल्याची घटना पुढे आली आहे. मारेकऱ्याने या मुलावर ५५ वेळा चाकूने वार केले. त्यानंतर त्याचा गळा चिरला. तसेच त्याचा मृतदेह ओढत रस्त्यावर आणला. यावर कडी म्हणजे, हे कृत्य करत असताना त्याने रस्त्यावर नृत्यही केले. हा थरार पूर्व दिल्लीतील वेलकम कॉलनी परिसरात मंगळवारी घडल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुमारे अडीच मिनिटांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी इतरांना धमकावत असल्याचेही दिसते आहे. आरोपीने १७ वर्षांच्या या मुलाकडे बिर्याणी आणण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, त्याने न दिल्याने रागाच्या भरात त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपीला बुधवारी सकाळी ताब्यात घेतले असून, त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. त्यानंतर पीडिताला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीमधील फुटेजनुसार, आरोपी पीडिताला एका छोट्या गल्लीत नेऊन त्याच्यावर वार करत असल्याचे दिसते आहे. आरोपी हे कृत्य करत असताना एकाने दार उघडून त्याला पाहिले; पण, आरोपीने त्याला चाकूने भोसकण्याची धमकी दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तो आजूबाजूच्या व्यक्तींना दूर राहण्यास ओरडून सांगत असल्याचेही दिसते आहे. हे करताना त्याने मद्यप्राशन केल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्रौर्याच्या सर्व सीमा पार

ज्यावेळी आरोपीने पीडिताला बिर्याणी आणण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी पीडिताने त्याला पैसे दिले नाहीत. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलगा हा जाफ्राबाद परिसरातील रहिवासी असून, आरोपीने सुरुवातीला बेशुद्ध होईपर्यंत त्याचा गळा दाबला.

त्यानंतर आपल्याजवळील छोट्या चाकूने त्याच्यावर बरेच वार केले. त्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने पीडिताला एका गल्लीत नेऊन त्याच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर आणि डोळ्यांच्या खाली सुमारे ५५ वेळा वार केले. यानंतर आरोपीने पीडिताच्या जवळ असणारे साडेतीनशे रुपये चोरले आणि तो तेथून पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT